India Languages, asked by shails4221, 1 day ago

3) कथालेखन : (80 ते 90 शब्द)पुढील शब्दांच्या आधारे समर्पक गोष्ट थोडक्यात लिहा :दिलेले शब्द : नवरा, दुबई, नवनवीन वस्तू, अपघात, नवऱ्याचा मृत्यू, कल्पकता, व्यवसाय.​

Answers

Answered by mad210216
106

कथा लेखन.

Explanation:

धाडसी सीमा.

  • एका गावात सीमा नावाची मुलगी राहायची. ती खूप हुशार आणि धाडसी होती.
  • तिचे लग्न नितेश नावाच्या मुलासोबत होते. नितेश दुबईमध्ये काम करत असतो. त्यांचे वैवाहिक जीवन सुखाने चालले असते. सीमा गावात आणि नितेश दुबईला असूनसुद्धा दोघांमध्ये भरपूर प्रेम असते.
  • चार चार महिन्यांनी नितेश गावी सीमाला भेटायला यायचा. येताना तो त्याच्यासोबत दुबईवरून नवनवीन वस्तू आणायचा.या सजावटीच्या वस्तू भारतात भेटत नसल्यामुळे, सगळेजण त्या वस्तूंची प्रशंसा करायचे.
  • सगळे काही ठीक चालले होते, परंतु एक दिवशी नितेशचा अपघात झाला आणि त्यातच तो मृत्यु पावला.
  • पतीच्या निधनाची गोष्ट कळल्यावर सीमाच्या पायाखालची जमीन हादरली. आता पुढे काय होणार? घरचा खर्च ती कसा भागवणार? ही चिंता तिला सतवत होती.
  • परंतु, ती धाडसी असल्यामुळे, ती खचून गेली नाही. तिच्या मनात एक विचार आला. तिच्या नवऱ्याने आतापर्यंत बऱ्याच सजावटीच्या वस्तू त्यांच्या घरी आणल्या होत्या.
  • त्या वस्तू सगळ्यांनाच आवडायच्या. सीमाने विचार केला की आपण या गोष्टींपासून व्यवसाय सुरु करूया. भारतात या गोष्टी मिळत नसल्यामुळे इथे नक्कीच या गोष्टी चांगल्या किंमतीत विकल्या जातील असे तिला वाटले.
  • हळूहळू, तिच्या व्यावसयाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि तिचा व्यवसाय वाढू लागला.
  • अशा प्रकारे, तिने स्वतःला व तिच्या कुटुंबाला आर्थिक रूपाने समर्थन दिले.
  • तात्पर्य: माणसाने जीवनात कधीही हिम्मत नाही हारली पाहिजे.
Answered by dolly326026
4

Answer:

कथालेखन (80 ते 90 शब्द)

3) पुढील शब्दांच्या आधारे समर्पक गोष्ट थोडक्यात लिहा :

दिलेले शब्द नवरा, दुबई, नवनवीन वस्तू, अपघात, नवऱ्याचा मृत्यू, कल्पकता, व्यवसाय,

SECTION 2 MARATHI (LL)

Similar questions