Hindi, asked by alwinrocks9189, 3 months ago

(3) कथालेखन :खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :एक गरीब मुलगा - पैसे नाहीतशाळेचा खर्च करणे अशक्यसकाळीपेपर टाकण्याचे कामवाटेत पैशाचे पाकिट मिळते - प्रामाणिकपणानेपोलिसस्टेशनवर नेऊन देतोपाकिटाच्या मालकास आनंद - बक्षीस​

Answers

Answered by anuksharahane67
233

Answer:

एक गरीब मुलगा असतो. त्याला खूप शिकून मोठे व्हायचे असते, परंतु त्याच्याकडे पैसे नाहीत आणि पैसे नसल्याने शाळेचा खर्च करणे अशक्य होते. त्याला एक माणूस सहज म्हणतो. आम्हाला एका मुलाची किंवा एका माणसाची गरज आहे. त्या मुलाने विचारले तुम्हाला कश्यासाठी एक मुलगा हवा आहे. तो माणूस म्हणतो, आमचे पेपर टाकण्यासाठी एक मुलगा हवा आहे आणि त्याला आम्ही मुबलक पगारही देऊ. तो मुलगा म्हणाला, मी आलो तर चालेल का? मी करेल! पेपर टाकायचे काम. त्याचा पेपर टाकण्याचा पहिला दिवस असतो, तो लवकर उठतो आणि दात घासतो, आंघोळ करतो आणि केस विंचरून निघतो. पहिल्या दिवशी सकाळी टाकण्याचे काम सुरू करतो. तो विचार करतो जर मी चांगले काम केले, तर मला मालक पगारही तसाच देतील आणि माझ्या शाळेसाठी देखील पैसे होतील. परत तो तसेच पेपर टाकत टाकत जातो आणि वाटेत पैशाचे पाकीट मिळते. त्याला असे वाटते की आपण हे पैसे आपल्याजवळ ठेऊत आणि थोडीफार याचीही मदत होईल आपल्या शिक्षणासाठी पण नंतर त्याला त्याच्या बाबांनी सांगितलेले आठवते. त्याच्या बाबांनी त्याला सांगितलेले होते की कधीही कष्टाचे पैसे मागायला पुढे - मागे बघायचे नाही, परंतु मेहरबानीचे पैसे कधीच घ्यायचे नाही. तो मुलगा प्रामाणिकपणाने पोलिसस्टेशनवर नेऊन देतो. पोलिस ते पाकिट खोलून बघतात, तर त्यात पैसे आणि काही कागद पत्र असतात. त्यात असलेले आधार कार्ड पोलिस बाहेर काढतात आणि त्यावर लिहिलेल्या फोन नंबरवर फोन करतात. तो फोन पाकिट मालकाला लागतो. पोलिस पाकिट मालकास पाकिट नेण्यासाठी पोलिसस्टेशनमधे बोलवतात. पाकिट मालक येतो. पाकिट बघतो त्यातील कागदपत्रे आणि पैसे जसेच्या तसे असतात म्हणून पकिताच्या मालकास आनंद होतो. आणि पकिताचा मालक त्या गरीब मुलाला १००० रुपये बक्षीस म्हणून देतो.

Answered by rajraaz85
74

Answer:

प्रामाणिक अजय

एकदा एका गावात अजय नावाचा मुलगा राहत असतो. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला काहीतरी काम करणे भाग होते. त्याने लोकांच्या घरी पेपर टाकण्याचे काम स्वीकारले. अगदी नित्यनियमाने तो दररोज सकाळी उठून प्रत्येकाच्या घरी जाऊन तो पेपर टाकत होता.

परिस्थितीने जरी गरीब असला मात्र तो खूप प्रामाणिक होता एकदा त्याला असेच पेपर टाकायला जात असताना वाटेत पैशांचे पाकीट मिळाले. त्याने पाकीट बघितले व पाकीट मध्ये पाकीट कुणाचे आहे, त्या माणसाचे नाव व पत्ता शोधू लागला पण त्याला काहीच मिळाले नाही. शेवटी त्याने जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन ते पाकीट दिले. थोड्यावेळापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी पाकीट हरवल्याची नोंद केली होती.

त्या माणसाला लगेच फोन करून बोलवण्यात आले.

पाकीट सापडल्यामुळे तो मनुष्य खूप खुश झाला कारण त्यात त्याचे महत्त्वाचे कागदपत्र होते. मुलाचा प्रामाणिकपणा पाहून तो खूश झाला व त्याला बक्षीस दिले. मुलालाही या गोष्टीचा आनंद झाला.

Similar questions