(3) कथालेखन :पुढील कथाबीजाच्या आधारे शौर्य कथा लिहा :एक मुलगा सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतो. कामाच्या ठिकाणी शर्ट भेटम्हणून मिळतो. घरी जाताना रेल्वेरूळ सरकलेले दिसतात. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते. शेकडो लोकांचेप्राण वाचवतो. मुलाला शौर्य पुरस्कार प्राप्त होतो. मराठी
Answers
सुबोध ची शौर्य कथा
श्रीरंगपुर गावात सुबोध नावाचा एक मुलगा राहत होता.त्याची घरची परिस्थिती फारच बिकट होता. सुबोधने बरेच कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले होते. सुबोध अत्यंत कष्टाळू मुलगा होता. कॉलेजमधून सुटल्यावर सुबोध अर्धा दिवस एका कारखान्यात काम करत असे.
. सुबोध अत्यंत प्रामाणिक होता. तो स्वतःचे काम काटेकोरपणे करत असे. तो जेथे नोकरी करत होता तेथील मालकाने त्याच्या कामाची दखल घेतली व त्याने केलेल्या कामाचे कौतुक म्हणून त्याला एक लाल रंगाचे नवेकोरे शर्ट भेट दिले.
. कारखान्यातील स्वतःची सर्व कामे आटपून सुबोध घरी जायला निघाला. कारखाना व सुबोध से घर यांच्या दरम्यान रेल्वेगाडीचे रूळ गेले होते. सुबोध ते रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जाणार तेवढ्यात त्याचे लक्ष सरकलेल्या रेल्वे रुळानी वेधून घेतले. प्रसंगाचे गांभीर्य सुबोधच्या लक्षात आले. त्याला एक युक्ती सुचली. कारखान्यात मालकाने दिलेल्या शर्टची आठवण त्याला झाली. त्याने तो लाल शर्ट लगेच बाहेर काढला. तेवढ्यातच एक रेल्वेगाडी भरधाव वेगात येत होती. सुबोधने हातातील लाल शर्ट लगेचच फडकवला व धावत्या रेल्वेला तात्काळ थांबवले. सुबोधने रेल्वे थांबवून शेकडो लोकांचे प्राण वाचवले. त्याच्या शौर्याची दखल गावातील सरपंच यांनी घेतली. सुबोधला शौर्य पुरस्कार देऊन त्याचा सत्कार केला
तात्पर्य : - प्रसंगावधान दाखवून धाडसाने केलेले कार्य किती अलौकिक असते हे कथेतून पाहायला मिळते
Answer:
please answer the Sir please