World Languages, asked by joya20, 4 months ago

3) कथालेखन
:
.
पुढील शीर्षकावरून कथा लिहा
:
'कष्टाची भाकरी हीच खरी सुखाची भाकरी।​

Answers

Answered by gayatri22876
139

Answer:

एका खेडेगावामध्ये लाकडाच्या मोळ्या विकणारा गरीब मजूर राहत होता. रोज जंगलामध्ये जाऊन स्वत:च्या पोटपाण्यासाठी प्रपंच करत होता. दिवसभर काबाडकष्ट करुन रोजीरोटी कमवत होता आणि नेहमी विवंचनेत असायचा. देवा एवढं कष्ट करुन माझ्या लेकराबाळांना पोटभर अन्न वस्त्र देऊ शकत नाही, सारखा त्याच काळजीत असायचा.

एक दिवस देवाला त्याची दया आली आणि देवाने ठरवलं याला काही तरी देऊया. कारण देवळात जाऊन नियमित प्रार्थना करी. पण त्यामुळे त्याच्या आयुष्यात काही फरक पडत नव्हता. देवाने त्याची परीक्षा पहायचं ठरवलं आणि रुपये, सोने नाणे भरलेला बटवा मोळीविक्या मजूर ज्या वाटेने जाईल त्या वाटेवर ठेवला. जेणेकरुन तो पैशाचा बटवा त्याला मिळेल आणि त्याचं भलं होईल. आपल्याच विवंचनेत मोळी विकणारा तो मजूर रस्त्याने चालू लागला. त्याच्या मनात एक विचार आला की, आंधळा माणूस रस्त्याने कसा बरं चालत असेल. म्हणून त्याने आंधळ्या माणसाची नक्कल करुन चालू लागला. पण थोडं पुढे गेल्यावर त्याला कळलं की हे काही सोपं नाही. तो चाचपडत चालत होता आणि मनात म्हणत होता की, मला कष्टाने मिळालेली हिच भाकरी बरी. तेवढ्यात आंधळ्याची नक्कल करत असलेला मोळीविक्या पुढे निघून गेला आणि पैशाचा बटवा मागे राहिला. देव म्हणाला, 'तुला मी दिलं. पण तू घेतलं नाहीस. तुला आंधळ्याची नक्कल कराविशी वाटली'. तेव्हा देवसुध्दा मोळी विकणाऱ्याला म्हणाला, 'तुला कष्टाची भाकरी मिळते तिच तुझ्यासाठी योग्य आहे'.

Explanation:

please follow and Mark me as intelligent

Answered by naukarkard
14

Answer:

This is for Board Exam Que question

Attachments:
Similar questions