English, asked by priya6360, 11 months ago

3. खाली दिलेल्या उतान्याचे 1/3 शब्दात सारांश लेखन करा. उताऱ्यास योग्य शीर्षक द्या.
10
युगायुगाच्या वाटचालीत मानवाने नाना धर्मपंथ जन्माला घातले. अनेक रूढी-परंपरांना जन्म दिला.
कधी काळी व्यवसायाच्या वाटणीमुळे निर्माण झालेल्या जाती, धर्माने सांगितलेल्या वर्णजाती, तर कधी प्रत्यक्ष
वर्णावरून पडलेले वांशिक भेद हे सगळं घेऊन आज आपण आधुनिक युगातून वाटचाल करतो आहोत.
इतिहासाच्या या प्रदीर्घ वाटचालीत माणसाच्या मनात काही वृत्ती-प्रवृत्तींचा उगम झाला आहे. प्राण्यांसारख्या
नैसर्गिक वृत्ती-प्रवृत्ती तर माणसाच्या ठिकाणी होत्याच होत्या; त्यात सामाजिक वृत्ती-प्रवृत्तींची अधिकची भर
पडली. या सामाजिक वृत्ती-प्रवृत्ती मानवी मनाशी व जीवनाशी इतक्या एकरूप झाल्या, की पुढे त्याही
माणसाला नैसर्गिकच वाटू लागल्या. यातून मग धार्मिक, वांशिक, जातीय हे कप्पे अधिकाधिक पक्के होत
गेले. आपला वंश, धर्म, जात, श्रेष्ठ; बाकीचे सगळे कनिष्ठ ह्या स्वकेंद्री वृत्तीतून ज्याच्या हाती उत्पादन
साधनांची मालकी आली त्या वर्गाने स्वत:च्या फायद्याची सामाजिक रचना उभारण्याचा प्रयत्न केला. हा
फायदा त्रिकालाबाधित कसा टिकून राहील यासाठीही त्याने अनेक सामाजिक उपरचना अस्तित्वात आणल्या.
हे सगळं करत असताना आपण कुणाचे हक्क हिरावून घेत आहोत, कुणाचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत,
कुणावर अन्याय करत आहोत, याचं कसलंही भान व भय या सत्ताधारी वर्गानं बाळगलं नाही. परिणामी
समाजाची शोषक व शोषित अशा दोन गटात विभागणी झाली. शोषणाच्या चिरकालीन आसक्तीनं शोषणाच्या
प्रक्रियेला अनेकविध आयाम दिले; त्यातून मग अन्याय-अत्याचाराचे सत्रच सुरू झाले. जगाच्या बहुतांश
सगळ्याच भूभागांवर कमी अधिक फरकाने ह्या सामाजिक अभिक्रिया घडलेल्या आहेत. ​

Answers

Answered by vaishnavi5751
3

Explanation:

मानवाची वाटचाल

मानवाने अनेक रूढी-परंपरांना जन्म दिला.नाना धर्मपंथ जन्माला घातले . हे सगळं घेऊन आज आपण आधुनिक युगातून वाटचाल करतो आहोत.माणसाच्या मनात काही वृत्ती-प्रवृत्तींचा उगम झाला आहे.अनेक सामाजिक उपरचना अस्तित्वात आणल्या.

हे सगळं करत असताना आपण कुणाचे हक्क, स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत याचं कसलंही भान व भय साधनांची मालकी आली त्या वर्गाने बाळगलं नाही.समाजाची शोषक व शोषित अशा दोन गटात विभागणी झाली.सामाजिक अभिक्रिया घडलेल्या आहेत.

Similar questions