Science, asked by shivaninirmale2008, 1 month ago

२)3 or Hulol १) हालचाल प्रश्न क्र.२९. चहा चिनी मातीच्या कपात घेतला असता कमी गरम लागतो. पण स्टीलच्या कपात घेतला असता खप गरम लागतो कारण... १) स्टीलचा कप उष्णतेचे सुवाहक आहे. २) चिनी मातीचा कप उष्णतेचा दुर्वाहक नाही. ३) स्टीलचा कप उष्णतेची दुर्वाहक आहे. ४) चिनीमातीचा कप उष्णतेची सुवाहक आहे (०१)​

Answers

Answered by pakolur
0

Answer:

पाण्यानंतर सर्वाधिक प्रमाणात कोणते पेय घेतले जात असेल तर ते म्हणजे चहा! अनोख्या स्वादामुळे जगन्मान्यता मिळवलेल्या या पेयाने जगभरात आपले स्वत:चे असे एक ‘कल्चर’ रुजवले आहे. चहाची उत्पत्ती असो, तो बनवण्याच्या पद्धती असोत की सेवन करण्याच्या सवयी या सगळ्यामध्ये प्रदेशानुरूप वैविध्य जाणवत असले तरी या चहापान प्रक्रियेतला एक घटक सर्वमान्य पावला आहे, तो म्हणजे कप-बशी. अर्थात, मातीच्या चहापात्रापासून सुरू झालेला प्रवास आजच्या आकर्षक ‘क्रॉकरी’पर्यंत येऊन स्थिरावण्यास शतकानुशतके जावी लागली आहेत. सकाळी ज्यावाचून बहुतेकांचे पान हलत नाही, तो चहा ज्यापासून बनतो त्या पानांचा म्हणजेच रूढार्थाने चहापत्तीचा माणसाला पत्ता लागून हजारो वर्षे लोटली आहेत. त्यामुळेच कदाचित चहाच्या उत्पत्तीबाबत नेमकेपणाने सांगणे मुश्किलच नाही, तर जवळपास अशक्य कोटीतील बाब आहे. चहाची ओळख माणसाला नेमकी कशी आणि कोठे झाली याविषयी जगाच्या कानाकोप-यात एवढ्या वदंता, दंतकथा आहेत की ज्याचे नाव ते. पण या सगळ्या कोलाहलात चहाच्या उत्पत्तीचा सर्वाधिक प्रबळ दावेदार आहे तो चीन. त्यामुळे चहा बनवण्याच्या पद्धतीपासून तो ‘सर्व्ह’ करण्यापर्यंत सगळ्या बाबतीत अग्रक्रम याच देशाचा लागतो. पण चहाचे मूळ शोधत बसण्यापेक्षा त्याची सर्वत्र असणारी लोकप्रियता आणि त्या दृष्टीने या प्रक्रियेत असणारी कप-बशीची ‘युटिलिटी’ प्रकर्षाने लक्षात घेण्याजोगी आहे.

चहा हा आज दैनंदिन जीवनाचे एक अंग होऊन गेला आहे हे खरे, पण त्यासाठी तो सुलभपणे पिता येणेदेखील तेवढेच महत्त्वाचे होते. त्यासाठी चहा बनवला जाऊ लागला, तेव्हापासूनच म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीपासून तो कशा प्रकारे सहजपणे पिता येईल यासाठी माणसाची धडपड सुरू होती. आज आपण त्यासाठी कपबशीवर सर्वार्थाने अवलंबून असलो, तरी सुरुवातीला चहा पिण्यासाठीचे माध्यम म्हणून पुढे आले ते मातीचे भांडे. पण चहाबाबत एक अडचण अजून होती, ती म्हणजे गरम असतानाच तो पिण्याची खासियत. त्यामुळे त्यासाठी सुरुवातीपासूनच वेगळ्या प्रकारच्या भांड्यांची योजना करणे भाग पडले. टेराकोटा म्हणजेच भाजलेल्या मातीची भांडी अतिप्राचीन काळापासून सिंधू आणि ग्रीक संस्कृतीत चांगल्या प्रकारे घडवली जात असली, तरी या भांड्यांपेक्षा चहासारखे गरम पेय साठवण्यासाठी वा पिण्यासाठी उपयुक्त ठरली ती उच्च तापमानाची क्षमता धारण करणारी चिनी माती. कारण साध्या मातीची भांडी बनवण्यासाठी भट्टीचे तापमान 750 अंशांपर्यंत गेले तरी पुरेसे असते. पण चिनी मातीची भांडी घडवण्यासाठी भट्टीचे तापमान 1250 अंशांपर्यंत वाढवावे लागते. त्यामुळे ते अधिक परिपक्व असते. त्याचप्रमाणे ही भांडी घडतेवेळीच त्यावर चकचकीत मुलामा चढवणेही (ग्लेझ) शक्य असते. अशी ग्लेझची भांडी बनवण्याचे तंत्रज्ञान चीनमध्ये विकसित होत गेले. या मातीच्या घटकांमध्ये काही घटकांचे मिश्रण केले की (फ्लेक्सेस) एकाच तापमानाला आतील भांडे पक्के होते व त्यावरचे आवरण काच स्वरूपात बनते. हे अर्धपारदर्शक गुळगुळीत भांडे चहासारख्या गरम पेयासाठी उपयुक्त असल्यामुळे त्याची जोडी चहाशी जमवली जाऊ लागली. शतकानुशतके ग्लेझ असलेल्या या भांड्यांचा वापर चहापात्र म्हणून केला जात असला तरी तो ब-याच अर्थाने मर्यादित होता आणि मुख्य म्हणजे आजच्याप्रमाणे ‘टी सेट’ची प्रतिष्ठा त्याला प्राप्त झाली नव्हती. त्यासाठी कपाला कान बसवण्याची आयडिया प्रत्यक्षात साकारावी लागली अन् उजाडावे लागले 1750 साल!

तत्पूर्वी चहासाठी अनेक प्रकारच्या भांड्यांचे प्रयोग सुरू होते. वर उल्लेखल्यानुसार चिनी मातीपासून बनलेले चॉवान (ूँं६ंल्ल) म्हणजेच टी बाऊल चीन, जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरात होते. त्यांचा आकार तुलनेने मोठा असला तरी आजच्या कपाच्या तुलनेत उपयुक्तता काहीशी कमी होती. कारण गरम चहा त्यामध्ये ओतल्यावर ही पात्रेदेखील गरम होत असत. परिणामी अनेकदा हाताला, ओठाला चटकेदेखील सोसावे लागत. हे टाळायचे तर अधिक जाडीची भांडी बनवावी लागायची, पण त्यामुळे त्याच्या वजनापासून आकारापर्यंत अनेक समस्या उद्भवायच्या. कालौघात गो-या साहेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार सुरू केल्यानंतर अनेक प्रकारच्या व्यापार-उद्योगांनाही चालना मिळत गेली. मालाची आयात-निर्यात एका ठिकाणाहून दुसरीकडे सुरू झाली. त्यामध्ये मग चिनी मातीचे टी बाऊल मागे कसे राहणार? ब्रिटनमध्ये चीनमधून या टी बाउल्सची आयात सुरू झाल्यानंतर त्याला असलेली वाढती मागणी पाहता, रॉबर्ट अ‍ॅडम्स नामक माणसाने 1750मध्ये प्रथम सध्याच्या स्वरूपातील कप-बशीची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्याने कपाचा आकार छोटा करण्याबरोबरच त्याला कान असेल व सोबत बशी असेल, अशी योजना केली. त्याचप्रमाणे साहेबी थाटातल्या चहाची सवय लक्षात घेता टी पॉट, शुगर होल्डर, मिल्क व क्रीम कंटेनर असा अख्खा ‘टी सेट’च साकारला. रॉबर्टची ही आयडिया अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली. एवढी की कप-बशीचे हे मॉडेल पाहता पाहता अगदी ‘युनिव्हर्सल’ बनून गेले. चहाच्या बाबतीत कपाच्या तुलनेत बशी तशी नवखी असली तरी आज त्यांची सांगड सर्वत्र अगदी पक्की घातली गेली आहे. त्यामुळेच या कपबशा थेट घरोघरच्या ‘किचन कॅबिनेट’मध्ये विराजमान झाल्या आहेत. विविध आकार, प्रकार, रंगसंगती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तर त्यांना अत्यंत आकर्षक साज चढला आहे. एवढेच नव्हे तर उंची ‘क्रॉकरी’ हा स्टेटसचा विषय बनून गेला आहे. या अतिरिक्त बाबी वगळल्या, तरी कपबशी दररोज सकाळ-दुपार सर्वांच्या हाती सामावलेली दिसते ती तिच्या उपयुक्ततेमुळे, हे नि:संशय!

(संदर्भ : किंगफिशर हिस्ट्री एन्सायक्लोपीडिया, मॉडर्न पॉटरी मॅन्युफॅक्चर (एच.एन. बोस), द कम्प्लिट बुक ऑफ पॉटरी मेकिंग (जॉन केनी)

Explanation:

I think this is ur questions answer

Answered by akanshakhms20130753
0

Answer:

sure of sf my work schedule is very flexible on the time of the length of the hypotenuse of the day and ty for

Similar questions