(3) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
Answers
Answer:
वस्तूंचा जीव जरी नसला तरी त्यांच्या सोबत जीव नसल्यासारखे वागू नये
Answer:
कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. (वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो.)
Explanation:
कवी म्हणतात. की वस्तू जरी निर्जीव दिसत असल्या तरी त्यांना जीव नसल्यासारखे वागवणे अयोग्य ठरेल. वस्तू या मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत. त्या आपली सेवा करतात. आपल्या कामी येतात. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या वस्तूंशी प्रेमाने, आदराने वागले गेले. तर त्या सुखावतात. हे लक्षात घेऊन त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नये असा आशय या काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करत आहे. कोणतीही वस्तू निर्जीव असली तरी ती मानवी भावभावनांशी जोडली गेल्यावर अनमोल ठरते. व्यक्ती व ती वस्तू यांच्यात एक नाते तयार होते. ही वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देते. तिलाही तिचे स्वतंत्र स्थान/अस्तित्व आहे. तिलाही भावभावना आहेत. असा संवेदनशील भाव कवी प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे व्यक्त करत आहे.