3) प्रबोधनाचे सर्वात महत्त्वाचे मूल्य कोणते ?
Answers
Answer:
प्रबोधनकाल : यूरोपच्या इतिहासाची स्थूलमानाने प्राचीन युग, मध्ययुग व आधुनिक युग अशा तीन कालखंडांत विभागणी करतात. ग्रीक आणि रोमन संस्कृतींचा कालखंड म्हणजे प्राचीन युग होय. यूरोपमध्ये रोमन बादशाह कॉन्स्टंटीन याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यापासून प्रबोधनकालापर्यंतचा म्हणजे तेराव्या शतकापर्यंतचाकालखंड हे मध्ययुग होय. आधुनिक युगाचा प्रारंभ चौदाव्या शतकापासून होतो. चौदावे शतक हा प्रबोधनकालाचा प्रारंभ आणि पंधरावे व सोळावे अशी दोन शतके प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजतात.
ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.
वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे तीन घटक आहेत. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण - घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.
शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते.
बदलत्या काळात दृक्श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात. आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत आहे. अनेक नवीन कल्पना ग्रंथालयात बघायला मिळतात ग्रंथालयाचे विविध प्रकार अस्तित्वामध्ये आहेत कार्पोरेट व इंडस्ट्री क्षेत्रांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय ही तेथील कर्मचारी, व्यवस्थापक व अधिकारी, इंजिनियर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात. वेळेनुसार व आवडीनुसार या ग्रंथालयाचा या लोकांना लाभ घेता येतो. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर, तसेच व्यापारी हे आपल्या आवडीनुसार आपल्या घरांमध्येच ग्रंथालय तयार करतात. आपल्या व्यवसायानुसार ग्रंथसंग्रह जतन करणे त्याचं वाचन करणे अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथालये उभी राहताना दिसतात. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे. मात्र पुरेसा निधीअभावी आणि सामाजिक मदतीअभावी अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे डिजिटल ग्रंथालयाच्या साह्याने तुम्हाला जगभरातील अनेक मोलाचे ग्रंथ हे ग्रंथालयामधून वाचता येणे शक्य झाले आहे, इतकेच नाही तर कुणालाही त्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून नोंद करून हव्या त्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आज माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे त्या दृष्टीने ग्रंथालये ही वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये सामाजिक संघटनांनी अथवा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तसेच सरकारने योग्य ती जबाबदारी स्वीकारण्यानेस ही ग्रंथालय चळवळ ही ग्रंथालय चळवळ पुढे जाण्यास नक्कीच मदत होत आली आहे.
कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.
ग्रंथालयातील विविध विभाग :
१ ग्रंथोपार्जन
२ ग्रंथ वर्गीकरण
३ तालिकीकरण
४ देवघेव
५ संदर्भ
६ नियतकालिके
Explanation:
Hope this helps you please try to Mark me as brainlists please
जगाच्या इतिहासाची विभागणी स्थूल मानाने प्राचीन युग मध्ययुग व आधुनिक युग अशा तीन कालखंडामध्ये करता येईल.
- आधुनिक युगाचा प्रारंभ 14 व्या शतकापासून होतो. 14 वे शतक हे प्रबोधन काळाचा प्रारंभ आणि पंधरावे सोळावे शतक अशी दोन शतके प्रबोधनाचा उत्कर्ष काळ असे समजले जाते.
- प्रबोधन म्हणजेच रेनसन्स या इंग्रजी व फ्रेंच शब्दाचा अर्थ पुनर्जन्म किंवा नवजन्म असा होतो. प्रबोधन काळात धर्म संस्थेच्या म्हणजेच चर्च मानसिक बंधनातून मुक्त झालेल्या माणसांचा पुनर्जन्म असा ह्याचा अर्थ होतो.
- प्रबोधनाचे मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, विवेकशीलता, बुद्धीप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, या या बाबींमध्ये दडलेले आहे.
- या सर्व मूल्य विभागाच्या आधारावर साकार होणाऱ्या मानवी परस्पर संबंधांच्या आणि समाजाच्या कल्पनेवर आपण आपल्या आधुनिक समाज व संस्कृती यांचे प्रारूप बेतलेले आहे असे समजतो.
- कोणत्याही मूल्य व्युहाची सतत चिकित्सा करण्याची परंपरा समाजात निर्माण होणे आवश्यक असते आणि प्रबोधन काळात हा मूल्यव्युह स्वीकारला गेला.
#SP J2