History, asked by sahilgirsawade, 1 month ago

(3) 'स्थानिक पर्यटन' आणि 'आंतरराष्ट्रीय पर्यटन' यांतील फरक स्पष्ट करा.

-​

Answers

Answered by prachichavan205
29

Answer:

स्थानिक पर्यटन

१) स्थानिक पर्यटनामध्ये व्यक्ती देशातल्या देशात प्रवास करतो.

२) स्थानिक पर्यटनामध्ये देशांतर्गत प्रवास असल्यामुळे या प्रवासादरम्यान भाषा,चलन,कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो.

३) या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण या प्रवासाचे नियोजन करु शकतो.

आंतरराष्ट्रीय पर्यटन

१) आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये व्यक्ती देशाबाहेर प्रवास करतात.

२) आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी अधिकृत कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात.

उदा,पासपोर्ट, व्हिसा

३) जहाज,रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे हे अधिक सोपे झाले आहे.जहाजांमुळे समुद्रकिनार्यांवरचे देश जोडले गेले आहेत तर रेल्वेमुळे युरोप जोडला गेला आहे विमान वाहतुकीमुळे जग जवळ आले आहे.

Similar questions