(3) स्वमत:
'आजी : कुटुंबाचं आगळ' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
Answers
Answered by
2
Answer:
sorry mere samjh me nahi aaya
Answered by
18
'आजी : कुटुंबाचं आगळ'
Explanation:
- जुन्या काळात वाड्याच्या भोवती एक मोठी भिंत असायची. त्या भिंतीत एक दार असायचे. ज्याला आगळ बसवलेली असायची.
- या आगळीमुळे बाहेरच्या लोकांपासून घराचे व घरातल्या सदस्यांचे रक्षण व्हायचे. त्यामुळे, घरातील लोकांना सुरक्षित वाटायचे. ग्रामीण आयुष्यात आगळीचे महत्वाचे स्थान होते.
- त्याचप्रकारे, आजी ही कुटुंबाची प्रमुख असते. घरातील लोकं तिच्याकडे आदराने पाहतात.
- तिच्या शिकवणीमुळे व मार्गदर्शनामुळे सदस्यांना योग्य निर्णय घेता येतात व त्यांचे रक्षण बाहेरच्या लोकांपासून व वाईट विचारांपासून होते.
- आजी कुटुंबासाठी आधार असून तिच्या असल्यामुळे घरातल्यांना सुरक्षित वाटते.
- त्यामुळे, 'आजी: कुटुंबाचं आगळ' हे शीर्षक अगदी समर्पक आहे.
Similar questions