History, asked by crazyforstudy321, 1 month ago

3) शेख महंमद अविध। त्याचे हदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन कोणत्या संतानी लिहिले आहे।?
hey tell me answer no smap​

Answers

Answered by shrutiwackchaure
5

Answer:

army! hi I m also an army

Explanation:

armyyyyyy

Answered by dapushree
5

Answer:

- पार्श्वभूमी

तो काळ इस्लामी राजवटीचा. दिल्लीचा मुघलबादशाहा, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज तसेच देशात इतरत्र छोटी मोठी राज्य अस्तित्वात होती. या सर्व शाह्या सत्तेसाठी, स्वार्थापायी एकमेकांशी लढत होत्या, यात गोर-गरीब जनता भरडली जात होती. दुसर्‍या बाजूने समाजात अज्ञान, अंधश्रध्दा, कर्मकांड, जातीभेद, धर्मभेद विकोपाला गेला होता.

देशात बहुतांशी मुस्लिमांची सत्ता होती तर बहुसंख्य जनता हिंदू होती. दोन्ही धर्मात देव -देव, पूजाअर्चा, राहणीमान यात फरक होता. हिंदू मुर्तीपुजक तर मुस्लिम निर्गुण निराकार अल्लास भजणारे, हिंदू धर्मात जातीवर्ण व्यवस्था प्रबळ होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या वर्णव्यवस्थेची मुळे घट्ट रोवलेली होती. प्रत्येक जातीचे देव व परंपरा वेगळ्या होत्या. श्रेष्ठ, कनिष्ठ यावर जातीवाद होत होता. समाज बुरसट विचाराने रसातळाला गेला होता. समाज दिशाहीन झाला होता. अशावेळी एका समाधसुधारकाची, समानतेची वागणुक देणार्‍या महात्म्याची आवश्यकता होती ती पूर्ण झाली संत शेख महंमद महाराजांच्या रुपाने.

कादरी संप्रदाय जगातील सुफी संप्रदायाच्या चार उपपंथापैकी एक पंथ होय. या शिष्य परंपरेतील भारतात आलेला पहिला कादरी सुफी म्हणून महंमद गौस हा मानला जातो. याचेपासून शेख महंमदाची परंपरा मांडता येते. महंमद गौस - राज महंमद - कादरी चांदसाहेब (चंद्रभट उर्फ चाँद बोधले) कादरी महंमद साहेब म्हणजेच शेख महंमद अशी गुरू परंपरा आहे. चाँदबोधले यांचे दोन शिष्य ते म्हणजे जनार्धन स्वामी व शेख महंमद म्हणजे हे दोघे गुरू बंधु होय. जनार्धन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज अशी ही गुरूपरंपरा आहे. सुफी पंथ हा ध्यानधारणा, अनुष्ठाण, भजन, पूजन, योगसाधना, इ.वर भर देणारा व अद्वैत मानणारा आहे. एकंदरीत या चारही संप्रदायातील तत्वज्ञान व विचार प्रणाली थोड्याफर प्रमाणात सारखीच आहे. त्यात वारकरी संप्रदायाची समतावादी, सर्वांना मिळून मिसळून घेणारी, सरळमार्गी असणारी भक्ती शेख महंमदांना भावली व ते त्याच ठिकाणी रमले असे म्हणावे लागेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदा भेद भ्रम अमंगळ ॥ किंवा यारे यार ेलहान थोर। याती भलती नारी नर। करावा विचार । नलगे चिंता कवणाशी ॥ म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्व जाती-धर्म, वंश, लिंग आदींना सोबत घेणारा महाराष्ट्रातला सर्वात मोठा संप्रदाय होय. त्यांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून वारकरी परंपरेतील विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत केले.

त्यांनी 10 ग्रंथ लिहीले पैकी काही प्रकाशीत झाले तर अझुनही काही ग्रंथ अप्रकाशीत आहेत. 1 ) योगसंग्राम 2) पवन विजय 3) निष्कलंक प्रबोध 4) साठी संवत्सर 5) स्फुट रचना 6) अभंग 7) गायका 8) मदालसा 9) हिंदी कवीता 10) ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले आहेत. यामध्ये योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे. यात 18 अध्याय आहेत

Explanation:

उत्तर नाही मिळालं I'm sorry मी त्यांची माहिती पाठवली आहे तुला

Similar questions