3. शेतक-याविषयी तुमच्या भावना तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
Answers
Answer:
'रोज मातीत' या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ
यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दांत केले आहे. कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यातील सरीत कांदे लावते. जीव ओतून काम करते. काळ्या मातीला हिरव्या गोंदणाने सजवते. सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून, त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते. उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते. जणू ती स्वत:चे मनच त्यात दाबते. काड्या-काड्या जमवून आपला संसार सांधते. उन्हातान्हात दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न पाहते. विहिरीचे पाणी शेंदन काढते. अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते. काळ्या आईच्या कुशीत हिरवेगार पिकाचे स्वप्न पाहत मातीतच नांदत असते.
Answer:
शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. 'गावगाडा'कार त्रि.ना.आत्रे 'गाव वसविण्याचे आणि काळी वहीतीला आणण्याचे' श्रेय कुणबीकीला देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो वा कुळ, मिरासदार असो वा बटाईदार. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.
जगाचा पोशिंदा म्हणून खरी ओळख
रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतात. भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. सर्वांना लागणारे अन्नधान्य शेतकरी पिकवतो,म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते.