Hindi, asked by ramsuratgupta09, 1 year ago

(3) तुम्हाला शाळेतील आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास तुम्ही कधी व कसा करता ते लिहा.स्वमत​

Answers

Answered by Anonymous
69

मला संस्कृत हा विषय खुप आवडायचा मी या विषयावर अधिक प्रमाणात अभ्यास करत असे नेहमी धड्यांचे वाचन मी आवडीने करत त्यामुळे मला कधीचं कंटाळा नाही जाणवला....

मनापासून केल्याने सर्व होते, दुसऱ्यांना संस्कृत विषय अवघड जायचा, पण सुरवातीला मला ही अवघड जात असे सराव केल्यानंतर मला संस्कृत विषय सोपा झाला। ☺☺

Answered by rajraaz85
3

Answer:

आईवडिलांनी अगदी लहानपणापासूनच वाचनाची सवय लावली असल्यामुळे मला पुस्तके वाचण्यात खूप आनंद भेटत असे. जसजसा मोठा होत गेलो तसा शाळेतील विषयांमध्ये देखील खूप आवड निर्माण झाली. परंतु इतिहास हा विषय मला खूप आवडतो, कारण ज्या वेळेस शिक्षक इतिहास शिकवतात त्यावेळेस ते माझ्यासमोर घडतंय असे मला वाटते.

इतिहासातील प्रत्येक गोष्टी मला त्याच्याकडे आकर्षून घेते आणि म्हणूनच ती प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी मी आतुर होतो. शाळेचे इतिहासाचे पुस्तक मी अगदी मनापासून वाचतो आणि इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पुस्तक वाचत असताना शिक्षकांनी सांगितलेले प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात त्यामुळे वाचलेले अगदी मनात राहून जाते.

ज्यावेळी कुठली गोष्ट वाचत असताना आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ती आपल्या मनात उतरत असेल तेव्हा ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते. इतिहास हा विषय मला खूप आवडतो व जेव्हाही मी इतर विषयांचा अभ्यास करून थकतो तेव्हा इतिहासाचा अभ्यास आवडीने करतो.

Similar questions