India Languages, asked by reshmachavan819, 3 months ago

3) वैचारिक लेखन : 'केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।' या उक्तीवर वैचारिक लेखन करा.

Answers

Answered by sanjuupawar
6

Explanation:

या ओळी संत रामदास यांच्या आहेत. ते या ओळीत आपल्याला सांगतात की, आपल्याला एखादे अवघड काम यशस्वी करायचे असेल तर ते काम करायचा आधीच ठरवू नका की हे आपल्याला जमणार नाही. त्यासाठीच ते काम आधी करा. जेव्हा तुम्ही कराल त्यानंतर तुम्हाला ते अवघड वाटणार नाही . आणि तुम्ही ते यशस्वी रीत्या पुर्ण ही कराल. त्यामुळेच संत रामदास असे म्हणतात की केल्यानी होत आहे , आधी ते केले पाहिजे.

Answered by itskingrahul
5

Explanation:

-------केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।--------

आळस झटकून देऊन कामाला लागा मग तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत एकदिवस नक्कीच पोहचाल. असा विचार जर सत्यात उतरवायचा असेल तर प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! असे समर्थ रामदासांचे कटू वाटणारे पण तितकेच खरे शब्द प्रत्येकाला कर्माची प्रेरणा देऊन जातात.

वयाच्या उत्तरोत्तर जर कर्म करीत राहिलात तर एक दिवस कर्म हे बंधन न राहता जीवनाचा आवश्यक भाग होऊन जातो. असे कर्म आणि प्रयत्न हेच आपले देव बनतात. मानवी जीवनात कष्टाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची परिणीती आजच्या जीवनात होताना दिसत नाही परंतु तेच सत्य आहे.

आळसात आणि उन्मादात जीवन व्यतित करणे हे भविष्यात किती कष्टदायक असू शकते याचा नमुना तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांत पाहू शकता. जीवनभर कष्ट करण्याची तयारी न दाखवता पडून राहणे ज्यांना आवडते ते उतारवयात नरकयातना भोगत असतात.

फक्त शरीराचा विचार केल्यास कर्म हे कष्ट व व्यायाम या स्वरूपात ध्यानात घेतले पाहिजे मात्र कर्म करताना येणाऱ्या अडचणी आणि अडथळे ओळखून त्यावर मात करीत चांगल्या कामाला सुरुवात करणे हेच अनेकवेळा अपेक्षित असते. सुरुवातच काही जणांना कष्टप्रद वाटल्याने काहीजण कामच हातात घेत नाहीत मग ते पूर्ण कसे काय होईल?

केल्याने होत आहे रे, म्हणजे सुरुवातीला प्रत्येकाला प्रेरणेची आवश्यकता भासत असते. त्यामुळे समर्थ रामदास इथे असे म्हणतात की आधी करून तर बघ, अशक्य असे मग काहीच नाही. लोक स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगत नसल्याने काम करताना काचकुच करीत राहतात त्यांच्यासाठी हा विचार अनमोल ठरू शकतो.

Similar questions