3. वेगवेगळ्या भागात आहारात विविधता का असते?
Answers
Explanation:वेगवेगळ्या भागात आहारात विविधता का असते
Answer:
पृथ्वीवर संपूर्ण विभागात नैसर्गिक विविधता आढळते कारण प्रत्येक भाग हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. या प्रदेशाचा भौगोलिक परिस्थिती जशी असते त्यानुसार त्या प्रदेशातील व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या पद्धती असतात.
एखादा प्रदेश जर समुद्रकिनारी प्रदेश असेल तर त्या ठिकाणातील लोक मोठ्या प्रमाणात भात व मासे खातांना आढळतात.
जर एखाद्या प्रदेशामध्ये गव्हाचे उत्पादन जास्त होत असेल तर तिथे लोक गहू जास्त खातात.
काही प्रदेशांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथे बाजरीचे उत्पादन घेतले जाते व तेथील लोक जास्त बाजरी खाताना दिसतात.
ज्या प्रदेशांमध्ये जे फळ जास्त मिळतात त्या फळांचा आहारामध्ये समावेश केला जातो. जसे कोकणामध्ये खूप नारळ मिळत असल्यामुळे तेथील भाज्या बनवताना नारळाचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो.