3) वाक्प्रचार:
खालीलपैकी कोणत्याही 'दोन' वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
1) कानोसा घेणे
ii) हुकमत गाजवणे
iii) थक्क करणे
iv) मात करणे
Answers
Answer:
कानोसा घेणे :- अंदाज घेणे
वाक्यं :- प्रगतिपुस्तक दाखवताना सुप्रियाने अगोदर बाबांच्या मूडचा कानोसा घेतला.
मात करणे :- विजय मिळवणे
वाक्यं :- काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूमूळे संक्रमित झालेला राजेश डॉक्टरांच्या उपचाराने त्याने कोरोनावर मात केली.
वाक्प्रचार हा शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला शब्द समूह असतो.
१) कानोसा घेणे
अर्थ : अंदाज किंवा चाहूल घेणे
शिवरायांच्या मावळ्यांनी शत्रुच्या योजनेचा कानोसा घेतला .
२) हुकमत गाजवणे
अर्थ : वर्चस्व गाजवणे
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये हुकूमत गाजवली .
३) थक्क करणे
अर्थ : आश्चर्यचकित करणे
नेहमी शेवटी येणाऱ्या अरुणने परीक्षेमध्ये सर्वात जास्त अंक मिळवून सर्वांना थक्क केले .
४) मात करणे
अर्थ : विजय मिळविणे
भारताने २०११ मधील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेवर मात केली .