(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा :
ते म्हणाले, “लक्षात नाही आलं!"
Answers
Answer:
दिलेल्या वाक्यातील विरामचिन्हे खालील प्रमाणे-
(, )हे स्वल्पविराम आहे.
(" " )हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे.
(! )हे उद्गारवाचक चिन्ह आहे.
वरील वाक्यात तीन विराम चिन्हांचा वापर केला आहे.
Explanation:
विरामचिन्हे-
दिलेला वाक्याला शिस्तबद्ध करण्यासाठी म्हणजेच ते वाक्य कुठून सुरू करावे, कुठे थांबा घ्यावा, वाक्य कुठे संपवावे यासाठी या चिन्हांचा वापर केला जातो त्याला विरामचिन्हे म्हणतात.
लिहितांना किंवा वाचतांना विराम घेणे गरजेचे असते ते विराम घेण्यासाठी ज्या चिन्हांचा वापर होतो त्याला विरामचिन्हे असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. पूर्णविराम-(.) वाक्य संपले असे सूचित करायचे असेल त्यावेळेस वाक्याच्या शेवटी जे चिन्ह वापरतात त्याला पूर्णविराम म्हणतात.
उदा. राम शाळेत गेला.
२. स्वल्पविराम(,)- दिलेल्या वाक्यात एकापेक्षा जास्त गोष्टी सलग सांगायच्या असतील त्या वेळेस दोन शब्द स्वल्पविरामाने वेगळे करतात.
उदा. गणेशला आंबा, पपई, टरबूज आणि पेरू आवडतात.
३.एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हे (' ' " ")- ज्या वेळेस एखाद्या शब्दावर किंवा वाक्यातील शब्दावर किंवा शब्द समुदायावर भर द्यायचा असेल त्यावेळेस एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हांचा वापर केला जातो.
४.उद्गारवाचक चिन्ह(!)- ज्यावेळी उत्कट अशा भावना व्यक्त केल्या जातात तेव्हा उद्गारवाचक चिन्हांचा वापर केला जातो.
उदा. बापरे! केवढा मोठा साप!
५. प्रश्नचिन्ह(?)- एखाद्याला कुठलाही प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाच्या शेवटी या चिन्हाचा वापर केला जातो.
उदा. तुझे नाव काय आहे?
Answer:
' तू भाजी बनव छानपैकी पाल्याची ;! ती म्हणते?