4) आधुनिक भारताच्या ऐतिहासिक कालखंडात कोणत्या विविध वास्तू बांधल्या गेल्या ? ...
Answers
Answer:
भारतीय द्वीपकल्पातील (भारत व पाकिस्तान) वास्तुकलेचे सर्वांत प्राचीन नमुने सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत पहावयास सापडतात. मोहें-जो-दडो, हडप्पा, कालिबंगा व लोथल येथे वास्तुकलेचा सर्वांगीण आविष्कार दिसून येतो. नगररचना, नगररक्षण, धान्याची कोठारे, गृहरचना, पाण्याची कुंडे, इतकेच काय पण जहाजासाठी एक प्रचंड गोदी इतक्या सगळ्यांचा यात समावेश आहे. इ. स. पू. २००० ते १७०० च्या दरम्यान ही संस्कृती अस्तमान झाली. येथपासून पुढे हजार वर्षांच्या काळात भारतात कोणतीही उल्लेखनीय नागरी संस्कृती निर्माण झाली नाही.
या दरम्यान प्रागैतिहासिककालीन वसाहतींत सापडणाऱ्या बांबू-चिखलाच्या झोपड्या ‘वास्तू’ या प्रगल्भ अवस्थेस येऊन पोहोचल्या नव्हत्या. इ. स. पू. १०००-८०० च्या नंतर गंगा-यमुना यांच्या खोऱ्यांत जी काही नगरे उदयाला आली, त्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर सापडलेले नाहीत. तत्कालीन साहित्य, त्यानंतर लगोलग निर्माण झालेल्या वास्तू व शिल्पांतील प्रतिकृती यांवरून काही अंदाज बांधणे शक्य झाले आहे. मौर्यकाळात प्रथमच वास्तूंचे सुस्थित अवशेष मिळतात व तेथून पुढे भारतीय वास्तुकलेच्या प्रगतीचे एकसूत्री चित्रण करता येते.
कालखंडमौर्यकाळापासून पुढे दोन हजार वर्षे बांधण्यात आलेल्या वास्तूंचे ढोबळमानाने वर्गीकरण करून त्या त्या कालखंडांना विशेष नावे देता येतात. हे कालखंड व त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
इ. स. पू. ५०० ते इ. स. १०० : बौद्ध-पूर्वखंड (हीनयान); मौर्य, शुंग, कुशाण व सातवाहन राजवंशांचा आश्रय व प्रोत्साहन.
इ. स. १००० ते इ. स. ७०० : बौद्ध-उत्तरखंड (महायान) आणि हिंदू व जैन-पूर्वखंड; गुप्त, वाकाटक, बादामी-चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट.
इ.स. ७०० ते इ.स. १२०० : हिंदू जैन मध्यखंड, चोल पांड्य, कल्याणी चालुक्य, होयसूळ, चंदेल प्रतिहार, पाल.
इ. स. १२०० ते इ. स. १६५० : हिंदू-जैन-उत्तरखंड आणि इस्लामी कालखंड; विजयनगर आमि इतर दाक्षिणात्य घराणी, दिल्ली व इतर प्रांत येथील इस्लामी राजवंश.
इ. स. १६५० ते इ. स. १८५० : हिंदू-मराठा; राजस्थानी घराणी.
इ. स. १८५० ते इ. स. १९४७ : ब्रिटिश कालखंड (पाश्चात्य).
इ. स. १९४७ च्या पुढे आधुनिक किंवा नवशैली.
साधने आणि तंत्र
वास्तुकलेच्या प्रगतीच्या दृष्टीने वास्तुरचनेसाठी वापरण्यात येणारी साधने आणि बांधकामाची तंत्रे ही महत्त्वाची ठरतात. मौर्यकाळातील उत्खनित अवशेष तसेच वाङ्मयातील वर्णने यांचा अभ्यास करता, वास्तुरचनेचे साधन किंवा माध्यम म्हणून लाकूड आणि कच्च्या वा भाजलेल्या विटा या दोन गोष्टींचा उपयोग केलेला दिसतो. स्तंभ आणि तुला यांची चौकट हाच वास्तूचा मुख्य आधार असून त्यांच्या जोडीला वीटकाम, छपरासाठी खंगरी कौले, भिंतीवर मातीचा लेप व त्यावर रंगकाम केले जात असे. वास्तुरचनेसाठी दगडाचा उपयोग प्रथम अशोकाच्या काळात झाला. मात्र त्यानंतर दोन शतके उलटली तरी, त्या साधनाचा वापर करण्यात वास्तुकारांना फारसे कौशल्या प्राप्त झाले नाही.
दगड या पदार्थाच्या गुणावगुणाचे फायदे घेण्याऐवजी त्यांनी लाकडाच्या जागी दगडाचा उपयोग केला, एवढेच. स्तंभ, तुला, तोरणे ही लाकडी असावयाची; त्याऐवजी भारहूत, सांची इ. ठिकाणी ती दगडाची दिसतात. सातवाहन-गुप्त वंशांच्या दरम्यानच्या काळात स्तूप व मंदिरवास्तू दगडाच्या व निवासस्थाने लाकूड-विटांची असा प्रघात रूढ झाला असावा. गुप्तकाळातील बहुतेक मंदिरे संपूर्णपणे दगडी बांधणीची असली, तरी पुढच्या काळात मंदिराच्या भिंती दगडी आणि शिखरे व छपराचे इतर भाग वीटकामाचे बांधण्यात येऊ लागले. इस्लामी कालखंडात सर्व तऱ्हेच्या वास्तूंना दगड वापरण्यात आले आणि दगडाचे लाल, पिवळा तसेच संगमरवरी असे विविध प्रकार वेगवेगळ्या कामांसाठी वा वास्तूसाठी उपयोगात आले. भिंती दगडी असल्या तरी, त्यावरही मातीचा लेप देऊन चित्रकाम करण्याची पद्धत कायम राहिली.
Explanation:
भारतातील पहिले मोठे इस्लामिक राज्य दिल्ली सल्तनत होते, ज्यामुळे भारतीय आणि इस्लामिक वैशिष्ट्ये एकत्रित करून इंडो-इस्लामिक वास्तुकलाचा विकास झाला। मुघल साम्राज्याचा नियम, जेव्हा मुघल वास्तुकला विकसित झाली, तेव्हा ते इंडो-इस्लामिक वास्तुकलेचे शिखर मानले जाते, ताजमहाल हे त्यांच्या योगदानाचे सर्वोच्च बिंदू होते। इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा राजपूत आणि शीख शैलींवरही प्रभाव पडला।
ब्रिटीश वसाहत काळात, निओक्लासिकल, गॉथिक पुनरुज्जीवन आणि बारोकसह युरोपियन शैली संपूर्ण भारतात प्रचलित झाल्या। इंडो-इस्लामिक आणि युरोपियन शैलींच्या एकत्रीकरणामुळे एक नवीन शैली निर्माण झाली, ज्याला इंडो-सारासेनिक शैली म्हणून ओळखले जाते। स्वातंत्र्यानंतर, आधुनिकतावादी कल्पना भारतीय वास्तुविशारदांमध्ये वसाहतवादी संस्कृतीतून प्रगती करण्याचा मार्ग म्हणून पसरल्या। ले कॉर्बुझियर, ज्यांनी चंदीगड शहराची रचना केली त्यांनी 20 व्या शतकात वास्तुविशारदांच्या एका पिढीवर आधुनिकतेकडे प्रभाव टाकला। 1991 च्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या शहरी वास्तुकला अधिक बळकट झाली कारण देश जगाच्या अर्थव्यवस्थेशी अधिक समाकलित झाला। पारंपारिक वास्तुशास्त्र हे समकालीन युगात भारताच्या वास्तुकलेवर प्रभावशाली राहिले आहे।