English, asked by vyankateshbhandare11, 7 months ago

4 गुण
3) वाक्यप्रचार
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

3) ससेहोलपट होणे
4) कान देऊन ऐकणे​

Answers

Answered by rajraaz85
2

तारांबळ उडणे किंवा संघर्षपूर्ण जगण्यासाठी धडपड करणे म्हणजेच ससेहोलपट होणे

वाक्यात उपयोग-

  • बालपणातच अचानक आई-वडील गेल्यामुळे रोहितची जगण्यासाठी ससेहोलपट होत होती.
  • आजही समाजामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांची ससेहोलपट होत असते.
  • नवऱ्याने घराबाहेर काढल्यामुळे राधाबाईची ससेहोलपट झाली.
  • एका बाजूला श्रीमंत लोक पैशाची उधळण करत असतात तर दुसर्‍या बाजूला अनेक लोकांची जगण्यासाठी ससेहोलपट होत असते.

अतिशय लक्षपूर्वक ऐकणे म्हणजेच कान देऊन ऐकणे.

वाक्यात उपयोग-

  • शिक्षक वर्गात शिकवत असताना अलिषा अतिशय एकाग्रचित्ताने कान देऊन ऐकत होती.
  • मदन मालकाने सांगितलेल्या सर्व गोष्टी अतिशय कान देऊन ऐकतो आणि त्या व्यवस्थित रीतीने पूर्ण करतो.
  • कोणतीही गोष्ट कान देऊन ऐकल्याने त्याचे बरेचसे फायदे असतात व त्यामुळे काम अचूक रीतीने होण्यास मदत होते.
  • आशिष प्रत्येक गोष्टी कान देऊन ऐकल्यामुळे त्याचे काम अतिशय चोखपणे बजावतो.
  • आजी सर्व मुलांना झोपण्यापूर्वी गोष्ट सांगत होती आणि सर्व मुले ही तेवढ्याच उत्सुकतेने आजीकडे कान देऊन ऐकत होते.

#SPJ3

Similar questions