4) जाती कशास म्हणतात?
meman
Answers
Answer:
मानव समाजामधील जात ही एक सामाजिक प्रणाली आहे. हिच्यामध्ये - व्यवसाय, स्व गटातील व्यक्तीशी विवाह, संस्कृती, सामाजिक वर्ग, आणि राजकीय शक्ती एकत्रित गुंतलेल्या असतात. भारतीय समाज अनेकदा "जात" शब्दाशी संबंधित आहे, असे म्हटले जाते.
हा शब्द प्रथम पोर्तुगीजांनी त्यांच्या स्वतःच्या युरोपियन समाजात "वारसा वर्ग स्थिती"चे वर्णन करण्यासाठी वापरला होता. या शब्दाचा उगम १७व्या शतकात पोर्तुगीज casta (" वंश, जात") या शब्दातून झाला. इंग्रजीतील "जात" हा शब्द लॅटिन castus या शब्दापासून व carere या मूळ धातूपासून बनला आहे (अर्थ - वेगळा, कप्पाबंद.) युनिसेफने याला जात आधारित भेदभाव म्हटले आहे. प्रामुख्याने आशिया (भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, जपान) आणि आफ्रिका भागात ही सामाजिक व्यवस्था प्रचलित आहे.
युनिसेफच्या अंदाजानुसार जगभरातील २५ कोटी लोकांना जातिआधारित भेदभावाला तोंड द्यावे लागते. .[१]