4.कवितेकून मिळणारा संदेश??
akhila me das tuza
Answers
Answered by
0
कवितेतून मिळणारा संदेश
संत नामदेव कवितेतून आई, पक्षिण, गाय, हरिण या मातांचे आणि परमेश्वरचे साम्य दाखवतात. मातांच्या आणि परमेश्वराच्या ममतेचे कनवाळू वृत्तीचे समर्पक वर्णन केले आहे.
अभंगात संत नामदेव वेगवेगळ्या उदाहरणातून परमेश्वराची याचना करत आहेत.
Explanation:
- बाळ आगीच्या तडाख्यात सापडते तेव्हा आई त्याला वाचवण्यासाठी धावून जाते असे संत नामदेव कवितेत सांगतात.
- जेव्हा वणवा लागतो तेव्हा हरीण आपल्या पाडसासाठी कावरीबावरी होते आणि त्याच्यासाठी हरीण चिंता करते.
- पक्षिणीचे पिल्ले जमिनीवर पडतात तेव्हा पक्षिण त्यांना वाचवण्यासाठी जमिनीकडे झेप घेते.
- जेव्हा वासरू भुकेने हंबरते तेव्हा गाय सर्व काही सोडून त्याच्या हाकेच्या दिशेने धावते आणि त्याची भूक भागवते.
- जसं चातक पावसाची वाट बघतो तसच परमेश्वराच्या भेटीसाठी संत नामदेव वाट बघतात.
अश्या प्रकारे संत नामदेव कवितेतून आई, पक्षिण, गाय, हरिण या मातांचे आणि परमेश्वरचे साम्य दाखवतात. मातांच्या आणि परमेश्वराच्या ममतेचे कनवाळू वृत्तीचे समर्पक वर्णन केले आहे.
Similar questions