Geography, asked by crazyforstudy321, 14 days ago

4 मत्स्यशेती कशाला म्हणतात?
5 कृषी म्हणजे काय?​

Answers

Answered by sdayal32
4

Answer:

शोध पोर्टल

शेती

मत्स्यव्यवसाय

मत्स्यशेती

अवस्था:

उघडा

मत्स्यशेती

मत्स्यशेती (तलावामध्ये माशांची पैदास करणे)

व्यावसायिक कार्प-माशांचे प्रकार

माशांचे बहुसंस्करण

साठवणीपूर्वीची तलावाची तयारी

तलावांची साठवणी

तलावाचे साठवणीनंतरचे व्यवस्थापन

खत देण्यासाठी प्रस्तावित वेळापत्रक

पुरवणी खाद्य

वायूवीजन आणि पाणी बदलणे

उत्पादन गोळा करणे (सुगी)

माशांच्या बहुसंस्करणाचे अर्थशास्त्र

मत्स्यशेती (तलावामध्ये माशांची पैदास करणे)

व्यावसायिक कार्प-माशांचे प्रकार

कार्पस्-मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मुख्‍य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) तसेच तीन प्रकारचे परदेशी मासे चंदेरी, गवती आणि सामान्य असे मिळून देशातील मत्स्यशेती उत्पादनाचा 85% पेक्षा ही अधिक वाटा उचलतात.

Fish 1.jpg

गेल्या तीन दशकांत झालेल्या तंत्रशास्‍त्रीय प्रगतीमुळे तळी आणि तलावांतील सरासरी राष्ट्रीय उत्पादनाची पातळी सुमारे 600 कि.ग्रा./हेक्‍टरहून 2000 कि.ग्रा./हेक्‍टरपेक्षाही अधिक उंचीवर पोहोचली आहे. आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि हरियाणा यांसारख्या राज्यांतील अनेक शेतकरी आणि उद्योजकांनी तर 6-8 टन/हे/वर्ष इतकी उच्च उत्पादन पातळी गाठली आहे. माशांच्या प्रजाती, पाण्याचे स्त्रोत, खतांची उपलब्धता, चा-याचे स्त्रोत, इत्‍यादि आणि शेतकर्‍यांची गुंतवणूक करण्याची क्षमता यांना सोयीस्कर अशा नवनवीन पद्धतीही देशात विकसित झालेल्या आहेत. मत्स्यशेती ही शेतीच्या इतर पद्धतींशी खूपच सुसंगत आहे आणि त्यामध्ये जैविक कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्चक्रन करण्याचीही प्रचंड क्षमता आहे.

माशांचे बहुसंस्करण

भारतातील माशांच्या बहुसंस्करणामध्ये शेण किंवा पोल्ट्रीमधील विष्ठा यांसारख्या जैविक कचर्‍याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि जैविक आणि अजैविक अशा दोन्ही खतांच्या साहाय्याने त्यातून दरवर्षी दरहेक्टरी 1-3 टन उत्पादन मिळविता येते. चारा दिल्यामुळे माशांच्या पैदाशीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आणि चारा व खते यांच्‍या संयोजनाच्‍या योग्य वापराद्वारे दरवर्षी दरहेक्टरी 4-8 टन उत्पादन मिळते.

संशोधन संस्थेत तयार केलेल्‍या पद्धतींचा वापर देशाच्या विविध भागांतील 0.04-10.0 हेक्टर क्षेत्रफळाच्या आणि 1-4 मी. खोल तलावांत करण्यात आला, त्यामध्ये उत्पादनाच्‍या दरांत विविधता आढळली. लहान आणि उथळ स्थिर पाण्याच्या तलावात अशा अनेक समस्या आढळून आल्या ज्यामुळे माशांच्या वाढीवर परिणाम झाला तर आकाराने मोठे आणि खोल तलावाचे अनुपालन करणे कठीण ठरते. 0.4-1.0 हेक्टर आकाराचे आणि 2-3 मी. खोल पाण्याचे तलाव योग्य व्यवस्थापनासाठी सर्वोत्कृष्ट मानले जातात. माशांच्या बहुसंस्करणाच्या व्यवस्थापन पद्धतींमध्ये पर्यावरणीय आणि जीवशास्त्रीय पद्धतींचा समावेश होतो ज्यांचे विभाजन सर्वसाधारणतः साठवणीपूर्वीच्‍या, साठवणीच्या आणि साठवणीनंतरच्या अशा तीन प्रकारच्या क्रियांमध्ये करण्‍यात येते.

साठवणीपूर्वीची तलावाची तयारी

तलावाच्‍या तयारीमध्‍ये तलावास पाण्यातील तण आणि भक्षक यांच्यापासून मुक्त करणे आणि जगणार्‍या माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आणि त्यांच्या योग्य संवर्धनासाठी पुरेसा नैसर्गिक चारा उपलब्ध करणे ह्याचा समावेश होतो. पाण्यातील तणांचे नियंत्रण, अनावश्यक वनस्पतींचे उच्चाटन करणे आणि माती व पाण्याची गुणवत्ता वाढविणे ह्या व्यवस्थापनाच्या या टप्प्यातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत. भक्षक मासे आणि तण यांचे नियंत्रण कसे करावे याची चर्चा नर्सरी व्यवस्थापनामध्ये तपशीलवार करण्यात आलेली आहे.

तलावांची साठवणी

माशांच्या योग्य आकाराच्या बियाण्‍यांना त्यांनी नवीन वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर तलावामध्ये साठविण्‍यात येते. त्यापूर्वी तलावामध्ये खत घालून तो तयार करण्‍यात येतो. उच्च उत्पादन मिळविण्यासाठी माशांचा आकार आणि घनता दोन्ही योग्य असणे गरजेचे आहे. 100 मि.मी.पेक्षा मोठ्या आकाराच्या बोट्या संवर्धन संस्करणासाठी तलावात साठवण्यायोग्य असतात. लहान आकाराचे मासे साठविल्यास त्यांच्यामध्ये सुरूवातीच्या काही महिन्यांत मृत्युदराचे प्रमाण जास्त आणि वाढीचा वेग कमी असू शकतो. सघन बहुसंस्करण तलावांमध्ये, माशांचा जगण्याचा दर 90% पेक्षा जास्त आणि उत्तम वाढ मिळविण्यासाठी 50-100 मि.मी. आकाराच्या फिंगरलिंग्‍स् (बोट्या) वापरणे फायदेशीर ठरते. साधारणतः, 5000 बोट्यांची घनता हा बहुसंस्करण पद्धतीमध्ये वार्षिक 3-5 टन/हेक्टर उत्पन्न मिळविण्यासाठी दरहेक्टरी मासे साठवणीचा प्रमाणित दर मानला जातो. 8000-10000 दरहेक्टर घनता असलेल्या फिंगरलिगचा वापर वार्षिक 5-7 टन/ हेक्टर उत्पन्न मिळविण्यासाठी केला जातो. वार्षिक 5-7 टन/हेक्टर उत्पन्न मिळविण्यासाठी 15000-25000 दरहेक्टर घनता असलेल्या फिंगरलिगचा वापर करतात. माशांच्या बहुसंस्करणामध्ये तलावातील विविध भागांमधील खाणे मिळविण्यासाठी होणारी स्वप्रजातीय आणि आंतरप्रजातीय स्पर्धा कमी करण्यासाठी प्रजातींचे एकमेकांशी गुणोत्तर ठरवून देण्‍यात आलेले आहे. तलावात विविध विभागांत असणार्‍या खाद्याचा योग्य वापर व्हावा यासाठी विभिन्न कोपर्‍यांमध्ये वस्ती करून असणार्‍या दोन किंवा अधिक प्रजातींचा वापर करता येईल. कटला, चंदेरी, रोहू, गवती मासा, मृगळ आणि सामान्य मासा या सहा माशांचा गट यासाठी आदर्श मानतात. भारतात माशांची निवड मुख्यत्वे बियाणांची उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणी यावर ठरते. यापैकी कटला आणि चंदेरी हे पाण्याच्या वरच्या भागात राहतात, रोहू मधल्या भागात, गवती मासा मोठ्या वनस्पती असलेल्या भागांत तर मृगळ आणि सामान्य मासे पाण्याच्या तळाशी राहतात. पाण्याच्या वरच्या भागात राहणारे मासे 30-40% (कटला आणि चंदेरी), मधल्या भागातील 30-35% (रोहू आणि गवती मासा) आणि 30-40% तळाशी राहणारे मासे (सामान्य आणि मृगळ) हे प्रमाण सर्वसामान्यपणे तलावाच्या उत्पादनक्षमतेच्या आधारे स्वीकारले जाते.

Answered by dapushree
7

Answer:

4) मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदास कशी होते त्याचा अभ्यास करून, त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे अनेक लोकांच्या जेवणातील पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करुन त्या पासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.

5) कृषी विषयी माहिती

  • 5) कृषी विषयी माहितीया विभागात शेती विषयी माहिती कृषी क्रांती मार्फत देण्यात येते.कृषी सल्ला,पीक व्यवस्थापन,पशुसंवर्धन, हवामान, सेंद्रिय शेती, योजना,जोड धंदा इ. व अधिक माहिती मिळेल.
  • 5) कृषी विषयी माहितीया विभागात शेती विषयी माहिती कृषी क्रांती मार्फत देण्यात येते.कृषी सल्ला,पीक व्यवस्थापन,पशुसंवर्धन, हवामान, सेंद्रिय शेती, योजना,जोड धंदा इ. व अधिक माहिती मिळेल.शेतकरी शेतमाल मोफत जाहिरात खरेदी विक्री
  • 5) कृषी विषयी माहितीया विभागात शेती विषयी माहिती कृषी क्रांती मार्फत देण्यात येते.कृषी सल्ला,पीक व्यवस्थापन,पशुसंवर्धन, हवामान, सेंद्रिय शेती, योजना,जोड धंदा इ. व अधिक माहिती मिळेल.शेतकरी शेतमाल मोफत जाहिरात खरेदी विक्रीया विभागात शेतमालाची खरेदी,विक्री, भाड्याने देणे घेणे, साठी ऑनलाइन बाजारपेठ केली जाते

Explanation:

think it's helpful

Similar questions