4 types of essays in Marathi
Answers
Answer:
prasang lekhan
vaicharik lekhan
atmakathan
Explanation:
I know only 3.....
◆◆ मराठीत निबंधाचे चार प्रकार आहेत. खाली या चार प्रकारचे निबंध एका उदाहरणासोबत दिले गेलेले आहेतः■■
१. वैचारिक निबंध:
या निबंधामध्ये एखाद्या विषयाबद्दल सगळ्या बाजूंनी विचार करून आपले विचार शब्दांमध्ये मांडायचे असतात.
◆ या निबंधाचे उदाहरण:
■■ संगणक - काळाची गरज■■
संगणक विज्ञानाचा चमत्कार असून आजच्या काळाची गरज आहे.संगणकाचे विविध फायदे आहेत.
सांगणकाचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो.संगणकाचा उपयोग शाळा व कॉलेजमध्ये,रेलवे स्थानकांवर,विमानतळावर,हॉटेलमध्ये,ऑफिसमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.
संगणकामुळे आपल्याला आपल्या अभ्यासात व कामात खूप मदत होते.आपले काम लवकर आणि अचूकपणे करता येते.
अशा प्रकारे, संगणक खूप महत्वाचा आहे.
२. कल्पनारम्य निबंध:
आपल्याला एखाद्यी गोष्ट वास्तविक दुनियेत मिळू शकत नाही, पण ती गोष्ट आपल्याला मिळाली तर काय होईल? याबद्दल विचार मांडताना लिहिलेले निबंध म्हणजे कल्पनारम्य निबंध.
◆ या निबंधाचे उदाहरण:
■■मी पक्षी झालो तर!■■
मी पक्षी झालो तर मी रोज शाळेत उडत जाणार,माझ्या सगळ्या मित्रांपेक्षा मी आधी शाळेत पोहोचणार.मी वेगवेगळ्या झाडांवर बसेन. खूप फळे खाईन.
मला कुठेही जाताना गर्दीचा त्रास होणार नाही.मला ढग जवळून पाहायला मिळतील.मी वर आकाशातून जमिनीवरचा नजारा पाहणार.
मी खूप ठिकाणी फिरणार.परदेशी जाणार.मी रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाईल.
मी पक्षी झालो तर,खरच मला खूप खूप मजा येईल.
३. वर्णनात्मक निबंध:
एखाद्या वस्तू, व्यक्ती किंवा प्रसंगाबद्दल हूबेहूब वर्णन करताना लिहिले गेलेले निबंध म्हणजेच वर्णनात्मक निबंध.
◆ या निबंधाचे उदाहरण:
■■ बागेतील एक तास■■
एकदा मी माझ्या मामाकडे राहायला गेली होती.दुपारच्या वेळी मला कंटाळा आला म्हणून मी घरासमोर असलेल्या बागेत गेली.
या बागेत आंबा, फणस,नारळ यांची मोठमोठी झाडे आहेत.त्याचप्रकारे चिकू व केळीची झाडेसुद्धा आहेत.विविध फुलांची झाडे आहेत. ही सगळी झाडे पाहून मला खूप आनंद मिळत होता.
फुलांच्या सुवासाने माझे मन प्रसन्न झाले होते.बागेत फिरताना मला खूप मजा येत होती. बागेत एक तास कसा निघून गेला,काही कळालेच नाही.
४.आत्मवृत्तात्मक निबंध:
एखादी वस्तू किंवा व्यक्ति आपण आहोत असे समझून त्यांची जीवनकथा,त्यांच्या जीवनातील सुख:दुख आपल्याशब्दात सांगणे म्हणजेच आत्मवृत्तात्मक निबंध.
◆ या निबंधाचे उदाहरण:
■■रंग नसते तर,...!!■■
रंग नसते तर, या जगातील विविध वस्तू तितक्या आकर्षक दिसल्या नसत्या, जितक्या रंगासकट दिसतात.सगळे काही एकसारखेच वाटले असते.
जीवनात रंग नसल्यामुळे मन अगदी उदास झाले असते.सगळे काही सफेद आणि काळ्या रंगांमध्ये बघायला मिळाले असते.
रंग नसते तर,आपल्याला होळी फक्त पाण्याने खेळावी लागली असती. रंग नसते, तर चित्रकाराची मोठी पंचाईत झाली असती.त्याने त्याच्या चित्रात रंग कसे भरले असते?
म्हणून, रंग हे हवेच.