Hindi, asked by shreyawankhede49, 3 months ago

4)
व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा.​

Attachments:

Answers

Answered by plandge2006
66

Answer:

व्युत्पत्ती कोशाचे कार्य व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय, अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश!

व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते (१) मराठी भाषेतील - प्रमाण व बोली- शब्दांचे मूळ रूप दाखवणे.

(२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.

(३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.

(४) भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे.

Answered by pmahindrakar990
27

Answer:

उत्तर : व्युत्पत्ती कोशाचे कार्य व्युत्पत्ती म्हणजे एखादया शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश !

व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते :

(१) मराठी भाषेतील प्रमाण व बोली- शब्दांचे मूळ रूप व दाखवणे.

(२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.

(३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.

(४) भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे.

Similar questions