5
(2) सारांशलेखन :
पुढील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा :
यंत्राचे कर्तृत्व पाहिले, की मनुष्याचे मन थक्क होते खरे; पण हे कर्तृत्व दाखवणारी यंत्रे निर्माण
करण्याचे सामर्थ्य फक्त माणसात आहे, हे पुष्कळदा आपण विसरतो; म्हणून यांत्रिक युगाचे भव्य रूप पाहिले
किंवा त्यात क्षणाक्षणाला होणारी माणसाची धावपळ पाहिली, की मनुष्य सहज विचारतो, “यात माणसाचे
स्थान कोणते?"
माणसाचे स्थान सर्वांत महत्त्वाचे आहे. आपल्या भोवताली जे काही दिसते, ते माणसाने निर्माण केले
आहे. निसर्गाने जे दिले ते माणसाच्या हातांनी सुंदर सुंदर केले. निसर्गाने दिलेल्या काळ्या जमिनीत माणसाने
भरघोस पिके काढली. निसगनि दिलेल्या पाण्याच्या प्रवाहाचे मोठाले तलाव बांधले किंवा त्या पाण्यापासून
वीज निर्माण केली. निसर्गाने दिलेल्या काळ्या खडकांतून मने मोहून टाकणारी सुंदर, कोरीव लेणी खोदून
काढली. जन्मभर कारखाने चालवून मला जर सर्वांत महत्त्वाचे तत्त्व काही पटले असेल, तर ते म्हणजे
कुठल्याही कार्यात माणसाइतका महत्त्वाचा दुसरा घटक नसतो.
Answers
Answer:
प्रश्न, पुढील उताऱ्याचे एक-तृतीयांश इतका सारांशलेखन करा : कलेचं क्षेत्र जितक्या आनंदाचं आहे. तितक्या आनंदाचं शानाचंही क्षेत्र आहे. अभ्यासाच्या विषयातून आनंद लाभत नसेल, तर त्या अभ्यासाला काही अर्थच उरणार नाही: मग तो अभ्यास कुठल्याही विषयाचा असो. अध्ययन आणि अध्यापन या व्यवहारातला आनंद लोपला की, सारं संपलंच. गणिताचं प्रमेय सोडवताना लाभलेली तन्मयता आणि संगीतातल्या एखादया रागातून सुरांच्या नव्या नव्या वाटा शोधताना लागणारी समाधी यांत फरक मानू नये. चेतन आणि अचेतन वाटणाच्या सृष्टीतली रहस्ये आणि मानवी व्यवहारातले नाना प्रकार समजून घ्यायची ओढ लागणं, ही ज्ञानसाधनेची पहिली अटच आहे. जीवन धन्य व्हावं अशीच ही ओढ असते. सगळ्यांचीच गणितं नीट सुटतात असं नाही. प्रश्न असतो तो ही ओढ सुटू न देण्याचा. ती ओढ ज्ञानाच्या आणि कलेच्या क्षेत्रांत सारखीच असते. दोन्ही ठिकाणी योग्य - अयोग्य, सत्य-असत्य, वास्तव आणि भास यांचा विवेक करणारी बुद्धी अवश्य असते. म्हणून *बुद्धिजीवी ' या शब्दाचा अर्थ ग्रंथबद्घ ज्ञानापुरताच मर्यादित करू नये असं मला वाटतं.