5 6 awesome lines on my father in Marathi
Answers
Answered by
2
Answer:
माझे बाबा दिसायला किंचित उग्र व कडक शिस्तीचे वाटतात. पण ते मनाने फारच प्रेमळ आहेत
. आम्हा मुलांवर तर त्यांचा फार जीव. माझ्या अभ्यासातील प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष असते
. माझे सामान्यज्ञान वाढावे म्हणून ते निरनिराळी सचित्र पुस्तके आणून माझ्याकडून वाचून घेतात.
ते नवीन माहितीही छान समजावून सांगतात.
अभ्यासाबरोबरच मी भरपूर खेळावे असे त्यांना वाटते.
म्हणून ते मला स्वतः मैदानावर घेऊन जातात. तेथे इतर मुलांबरोबर पकडापकडी, चोर-पोलीस, बॅट-बॉल वगैरे खेळताना मला खूप मजा वाटते.
सुट्टीच्या दिवशी दुपारी कॅरम, पत्त्यांचे डाव वगैरे खेळ बाबा माझ्याबरोबर खेळतात. कधी कधी आई व ताईही या खेळात सामील होतात. मग आम्हा चौघांचा खेळ खूपच रंगतो. माझे बाबा सध्या मला सायकल चालवायला शिकवीत आहेत.
hope it helps u
plz mark BRAINLIEST
tannurao
Similar questions