Geography, asked by saniadawade8, 1 month ago

5) जैविक इंधनाचा वापर करणे गरजेचे आहे.​

Answers

Answered by vvfyv0085
1

Answer:

जैविक इंधन म्हणजे वनस्पतीजन्य तेलापासून तयार केलेले इंधन, त्यासाठी खाद्य आणि अखाद्य तेलाच्या वनस्पतींचा वापर होऊ शकतो. भारतासारख्या विकसनशील देशात खाद्य तेलाची टंचाई असतांना त्याचा वापर आपण जैविक इंधन निर्मितीसाठी करू शकत नाही. यास्तव अखाद्य तेलबिया वृक्षांचा जैविक इंधन निर्मितीसाठी पर्याय आपणापुढे आहे. आपल्याकडील हवामानाचा विचार केला तर जट्रोफा (वनएरंड), करंज, कडुनिंब, सिमारुबा (लक्ष्मीतरु) आणि जोजोबा इ. वृक्षांची जैविक इंधन अर्थात बायोडिझेलसाठी लागवड योग्य ठरू शकते

Similar questions