5) मानसशास्त्र …. प्रक्रियांचा अभ्यास करण्याचे शास्त्र होय (मानसिक,शारीरिक,सामाजिक.)
Answers
Answer:
Explanation:
मानसशास्त्र (इंग्लिश भाषा|इंग्लिश): Psychology, सायकॉलॉजी ;) हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा इंग्रजी शब्द रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञाज्याने १६व्या शतकात तयार केला.. हा शब्द psyche साईक'(मन)' व logus लोगस(शास्त्र) या शब्दांवरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला.'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केली गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा.संवेदना,विचार,भावना इ.)'वर्णन करावयास सांगितले गेले, परंतु इ.स.च्या २०व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतांनुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (behaviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२०च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६०च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. '[मन]' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांत दिसू लागला.आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली -'वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, मुलाखतीसारख्या व्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो; मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.
मानसशास्त्र - व्याख्या :
'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.