5] महानगरपलिकेच्या विविध समस्यांची नावे लिह
Answers
Answer:
महानगरपालिका’ या संज्ञेचा अर्थ म्हणजे मुंबई महानगरपालिका अद्ययावत अधिनियम १८८८ अंतर्गत गठीत बृहन्मुंबई महानगरपालिका. या रचनेमध्ये प्रभाग निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले २२७ नगरसेवक आणि ज्यांना महापालिका प्रशासनाशी निगडित विशेष माहिती आहे अथवा अनुभव धारण केलेला आहे, असेमहानगरपालिकेने नामनिर्देशित केलेले ५ नगरसेवक यांचा समावेश असतो (कलम ३ आणि ५). महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेपासून ५ वर्षाचा असतो (कलम ६). नगरसेवकांचा कार्यकाल कालावधी हा महानगरपालिकेच्या कालावधीसम असेल. (कलम ६ अ). दि. १५ फेब्रुवारी २००७ चा शासन अध्यादेश क्रमांक बीएनएम.५००५/४६/ सी.आर.७/भाग-चार/नवि-३२ अन्वये सर्वसाधारण निवडणुकीनंतर महानगरपालिकेने त्यांच्या पहिल्या विशेष सभेत नगरसेवकांमधून एकाची महापौर आणि दुसऱयाची उपमहापौर म्हणून निवड करावयाची असते.
इतर प्रत्येक बाबतीत महापौर हे सभा निश्चित करतील, अथवा त्यांच्या अनुपस्थितीत उप महापौर किंवा अध्यक्ष, स्थायी समिती हे सभा निश्चित करतील.
महानगरपालिका विविध समितींचे सदस्य नामनिर्देशित करते जसे की, १) वैधानिक समिती, २) विशेष समिती, ३) सल्लागार समिती आणि ४) महानगरपालिकेच्या उप- समितींचे सदस्य.