51. भूक कथेतील नायिकेचे नाव काय?
(1.5 Points)
रखमा
शेवंता
जनाबाई
भागू
Answers
Answer:
kya h bhai khud se krna time kyu waste kr rha h khud ka yaha pr sab chuchiye h koi sahi jawab nhi dega
Answer:
भूक कथेतील नायिकेचे नाव भागू कोळी असते.
Step-by-step explanation:
भूक ही बाबुराव बागुल यांची अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे.भुक माणसाला काय काय करायला लावते त्याचे ज्वलंत उदाहरण बाबुराव बागुल यांनी आपल्यासमोर या कथेच्या माध्यमातून प्रस्तुत केलेले आहे.
कथेतील नायिका भागू कोळी ही अतिशय आजारी असते. तिचे शरीर तापाने फणफलेले असते. भागू व तिचे दोन लहान मुले भुकेने व्याकूळ झालेले असतात. भागूच्या शरीरात एवढाही त्राण नव्हता की ती बाहेर जाईल व आपल्या मुलांसाठी काहीतरी आणू शकेल. परंतु भुकेची तीव्रता वाढत असल्यामुळे ती नाईलाजास्तव आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे भीकाला गावातील पाटलीन बाई कडे भाकरी मागण्यासाठी पाठवते. पाटलीन बाई श्रीमंत असल्यामुळे ती भिकाचा अपमान करते, त्याला बरे वाईट बोलते, पण भुकेमुळे भिकाला ते सर्व सहन करावे लागते. तिकडे लहान मुलगा देखील सखु कडे जाऊन नागलीची भाकरी आणतो. आता या भाकरी सोबत काहीतरी मुलांना चांगले खाऊ घालावे यासाठी भागू समुद्रावर जाऊन मासे पकडण्याचा प्रयत्न करते. अहीर मासा पोस्टीक असतो आणि तो मुलांना खाऊ घालावा अशी तिची इच्छा असते. आईने पकडलेले मासे घेऊन भिका गावाकडे विकण्यासाठी जात असताना त्याला एक साप दिसतो. व तो साप आपल्या आईलाच चाऊ नये म्हणून त्याला तो तिथून पळवून लावतो. थोड्यावेळाने अहीर मासा समजून भागू त्याच माशाला आपल्या जाळ्यात पकडते. व घरी येऊन मुलांना त्याच सापाची भाजी करून खाऊ घालते. भिका घडलेला प्रसंग जेव्हा आईला सांगतो. ते ऐकून भागू अत्यंत घाबरते व तिला वाटतं की साप खाल्ल्यामुळे आता आपले मुलं मरतील. या धक्क्यामुळे भागूचा जीव सुटतो व ती मृत्युमुखी पडते. मुलांच्या आयुष्यात पुन्हा दारिद्र्याचा अंधःकार पसरतो.