Hindi, asked by deshmukhadesh639, 10 days ago

6 5 ब) (३) पुढील मुद्यांच्या आधारे धरिला पंढरीचा चोर' या कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. १) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री २) कवितेचा विषय ३) कवितेचा काव्यसंग्रह ४) कवितेतून व्यक्त होणारा विचार ५) कविता आवडण्याचे कारण . 3- स्थलवाचन

Answers

Answered by BRAMHAN1SHER
0

Answer:

Mark as brainliest

Explanation:

Mark as brainliest a B D-true c false

Answered by rajraaz85
1

Answer:

कवितेचे नाव- धरिला पंढरीचा चोर

कवयित्री -धरीला पंढरीचा चोर या कवितेची कवयित्री संत जनाबाई आहेत.

कवितेचा विषय- ज्याप्रमाणे एखाद्या कैद्याला तुरुंगात कैद करण्यात येते, त्याच प्रमाणे आपल्या भक्तीच्या जोरावर संत जनाबाई परमेश्वराला म्हणजे विठ्ठलाला आपल्या हृदयात  कोंडून घेण्याची इच्छा प्रकट करतात.

कवितेचा काव्यसंग्रह- संत जनाबाईंचा सकल संत गाथा खंड पहिला जनाबाई अभंग या काव्यसंग्रहातील हे काव्य आहे.

कवितेतून व्यक्त होणारा विचार- विठ्ठला बद्दल असणारे प्रेम आणि आसक्ती व्यक्त करण्यासाठी तसेच विठ्ठलाच्या जास्तीत जास्त सहवास लाभण्यासाठी संत जनाबाई विठ्ठलाला आपल्या हृदयातच बंद करून ठेवण्याबद्दल बोलतात.

कविता आवडण्याचे कारण- संत जनाबाई यांनी अतिशय साध्या सरळ आणि सोप्या शब्दात आपल्या अभंगाच्या माध्यमातून परमेश्वराला विनंती केली आहे. परमेश्वराची साथ लाभावी यासाठी ती प्रयत्न करत आहे. संत जनाबाईंची असलेली परमेश्वराबद्दलची आर्तता आणि भक्ती या कवितेतून दाखवल्यामुळे ही कविता फार आवडते.

Similar questions