60 आणि 36यां मसावि ---------- आहे
Answers
अंकगणितातील महत्वाचा भाग म्हणजे लसावी आणि मसावी काढणे. स्पर्धा परीक्षेत यासंदर्भातील बरेचशे प्रश्न असतात पण मुलांचे ते चुकतात. यासाठी सूत्र पाठांतर गरजेचे आहे.त्यासंदर्भातील काही सूत्र खाली देत आहे त्याची घटवणूक उदाहरणाद्वारे घेतल्यास तो घटक कायम लक्षात राहू शकतो. काही सूत्र माहिती असतील तर त्या आधारेच दुसरी सूत्रबनवलेली आपल्याला आढळून येतील.
ल.सा.वि. व म.सा.वि. सुत्रे
१)पहिली संख्या * दुसरी संख्या = ल. सा. वि. * म. सा.वि
२)पहिली संख्या =
मसावि * लसावि / दुसरी संख्या
३)दुसरी संख्या =
मसावी * लसावि / पहिली संख्या
४)मसावि =
पहिली संख्या * दुसरी संख्या / लसावि
५)लसावि =
पहिली संख्या * दुसरी संख्या / मसावि
६)लसावी / मसावि= असामायिक अवयवांचा गुणाकार
७)मोठी संख्या =
मसावि * मोठा असामायिक अवयव
८)लहान संख्या = मसावि * लहान असमायिक अवयव
वरील सूत्रांपैकी पहिल आणि सहाव्या क्रमांकाच सूत्र मुलांच्या लक्षात आणून दिल आणि बाकीची सूत्र कशी तयार झाली याचा उदाहरणाद्वारे सराव घेतल्यास हा घटककायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहील.