6th Standard Marathi
प्र.३.अ. वाकप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा: १. अफवा ऐकणे
Answers
Answer:
1) नाव मिळवणे.
अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम
येऊन सुप्रियाने नाव मिळविले.
2) रक्ताचे पाणी करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी
केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
3) सोंग काढणे.
अर्थ :- नक्कल करणे.
वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब
सोंग काढतो.
4) रात्रीचा दिवस करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले.
5)भांबावून जाणे.
अर्थ :- गोंधळून जाणे.
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात
आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो भांबावून गेला.
6)डोक्यावर घेणे.
अर्थ :- अतिलाड करणे.
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला
आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर
घेतले.
7) आळा घालणे.
अर्थ :- बंदी आणणे.
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.
8) तीरासारखे धावणे.
अर्थ:- खूप वेगाने धावणे.
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश
स्पर्धेत तीरासारखा धावतो.
9) मर्जी राखणे.
अर्थ :- खूश ठेवणे.
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी
जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.
10) संगोपन करणे.
अर्थ :- पालनपोषण करणे.
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने
तिचे संगोपन केले.
11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.
12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.
13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.
14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.
15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.
16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.
17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.
18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.
19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.
20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.
Explanation:
Hope it helps
Explanation:
नमस्कार मित्रांनो Vakprachar In Marathi या पोस्ट मध्ये मी तुम्हाला मराठी वाक्प्रचार यादी देणार आहे. आणि सोबतच Marathi Vakprachar Arth Ani Vakyat Upyog कसे करायचे हे ही या पोस्ट मध्ये सांगणार आहे.
आणि तुम्ही 1001 मराठी Vakprachar ची यादी pdf स्वरूपात फ्री डाउनलोड करू शकता. Pdf डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पोस्ट च्या शेवटी दिलेले डाउनलोड बटन वर क्लीक करायचे आहे