7. मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?
Answers
Answer:
१ ) बुबुळाच्या मध्यभागी डोळ्याची बाहुली म्हणजे बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते . प्रकाश जास्त असल्यास बाहुलीचे आकुंचन होऊन प्रकाशाचे नियंत्रण होते . तसेच प्रकाश कमी असल्यास बाहुली रुंदावून जास्त प्रकाश डोळ्यात शिरतो . अशा प्रकारे प्रकाशाचे प्रमाण नियमित होते . ( २ ) मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू डोळ्यातील लवचीक भिंगाची वक्रताग्य प्रमाणात बदलतात . त्यामुळे भिंगाचे नाभीय अंतर बदलून दृष्टिपटलावर वस्तूची वास्तव प्रतिमा तयार होते . मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू शिथिल असताना भिंग कमी फुगीर असते आणि दूरच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा दृष्टिपटलावर मिळते . त्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसते .
दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होणे ( प्रारूप आकृती ) जवळची वस्तू बघायची असल्यास डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू आकुंचन होऊन नेत्रभिंगाची वक्रता वाढवतात . त्यामुळे भिंग फुगीर होऊन त्याचे नाभीय अंतर कमी होते . त्यामुळे जवळच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा दृष्टिपटलावर मिळते , त्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसते .