8
खालील उतारा वाचा, त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा,
आपल्यासारख्या सामान्यांना शब्दांचाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत, आपल्याला
कठीण, साधे, सरळ, चक्र कसे का होईना, पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे
किती अनंत प्रकार असतात, 'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी क्षण आहे. त्या चालीवर 'माणसे तितकी बोलणी' अशी
म्हण बनवायला हरकत नाही. 'मोकळा संवाद' असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळया
संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण
खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक
गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात, त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत
असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधीकधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते.
एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो.
वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही,
समोरच्या व्यक्तीचं मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्याची लागते.
Answers
Answered by
3
Answer:
hi
Explanation:
don't know
Similar questions
Art,
3 months ago
Math,
3 months ago
Computer Science,
7 months ago
Business Studies,
7 months ago
Biology,
1 year ago
Science,
1 year ago