India Languages, asked by sawantswaraj9999, 1 year ago

80 ते 100 शब्दांत प्रसंगलेखन - तुमच्यासमोर चिमणीचे पिल्लू जखमी होऊन पडले आहे आणि एक मांजर त्याला पळवण्यासाठी टपले आहे ​

Answers

Answered by bestanswers
27

मी सुट्टीत आमच्या कोकणातल्या गावात  गेले होते. आमच्या घरासमोर एक मोठं अंगण आहे. तिथे मी सकाळी कोवळ्या उन्हात बसले होते. आसपास भरपूर झाडं असल्यामुळे खूप पक्षी येऊन किलबिलाट करत होते. काही पक्षी अंगणात येऊन दाणे टिपून जात होते तर काही जवळच्या तळ्यात पाणी पित होते.  

अचानक एक चिमणीचं पिल्लू येऊन खाली अंगणात पडलं. कोणत्यातरी प्राण्याने त्याला जखमी करून सोडलं होतं. ते कसंबसं  उडत येऊन आमच्या अंगणात पडलं असावं. मी त्या पिल्लाजवळ जाऊन त्याला बघून आले. त्याला पाणी पाजावं  ह्या हेतूने मी घरात गेले आणि एका भांड्यात पाणी घेऊन आले.

तेवढ्या वेळात बाजूलाच असलेली एक मांजर त्या पिल्लाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. मला तिचा हेतू समजला आणि मी त्या मांजरीला तेथून हाकललं. चिमणीच्या पिल्लाला मऊ कपड्यात गुंडाळण्यासाठी एक कापड आणण्यासाठी मी घरात गेले. तर तेवढ्या वेळात ती मांजर त्या पिल्लाला पळवण्याच्या हेतूने पुन्हा जवळ आली. मी शक्य तितक्या वेगाने मांजरीला हाकलून दिले आणि पिल्लाला हलक्या हाताने घरात घेऊन आले.

Similar questions