9. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?
(आ) रानमेवा कुठे उगवला आहे?
(३) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सागत आहे?
(ई) कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
Answers
कवितेचा आशय :-
शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला खूप आनं होतो. त्याच्या कष्टाचे चीज होते. या कवितेमध्ये शेतातील पिकाचे व शेतकऱ्याच्या मनातील भावनांचे यथोचित वर्णन केले आहे.
कवितेचा भावार्थ :
आनंद व्यक्त करताना शेतकरी म्हणतो. माझ्या शेतात मोत्यासारखे पीक आले आहे.
माझ्या अंगणात मोत्याचे चांदणे पसरले आहे.
(१) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?
उत्तर - कवीच्या अंगणात मोती-पोवळ्यांची रास पडते. म्हणजेच ग्हूव ज्वारीच्या दाण्यांची
रास पडते.
(२) रानमेवा कुठे उगवला आहे?
उत्तर - रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे.
(३) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?
उत्तर - रानमेवा एकमेकांना दिल्या-घेतल्याने वाढतो, म्हणून कवी सर्वांना गुण्यागोविंदाने
रानमेवा खायला सांगत आहे.
(४) कवीच्या अंगणात पाखरे का येतात?
उत्तर - कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात.