English, asked by nirmlatetare, 2 months ago

(अ-1) पत्रलेखन :
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही
एक कृती सोडवा.
लालनगर, इचलकरंजी, येथील कचरा कुंडीतील कचरा
वेळेत न हालविल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास
कचरा कुंडीतील कचरा
हालविण्यासाठी
मा. नगराध्यक्षांना
विनंती करणारे पत्र लिहा.
किंवा
कचरा कुंडीतील कचरा
लवकर नेल्याबद्दल
मा. नगराध्यक्षांचे अभिनंदन
करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by mad210216
14

पत्रलेखन

Explanation:

प्रति,

सन्माननीय नगराध्यक्ष,

लालनगर,

इचलकरंजी नगरपालिका.

विषय: कचरा कुंडी हालविण्यासाठी विनंती पत्र.

माननीय महोदय,

नमस्कार.

मी, जयेश शिंगे, लालनगरचा रहिवाशी आहे. पत्र लिहिण्याचे कारण की आमच्या इमारतीसमोरच एक कचराकुंडी आहे.  

नेहमी ही कचराकुंडी कचऱ्याने पूर्ण भरून जाते, परंतु कचरा साफ करणारे कामगार वेळेवर कचरा उचलायला येत नाही. ज्यामुळे, परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंध पसरतो.

कचराकुंडीच्या आजूबाजूला कचरा पडलेला असतो, ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होते.

या कचराकुंडीमुळे मच्छरांचे प्रमाण वाढले आहे, त्याच्याबरोबर विविध रोग होण्याची भीती सुद्धा वाढली आहे.

कृपा करून आपण ही कचराकुंडी येथून लवकरात लवकर हटवावी.

आशा करतो की आपण या समस्येतून आम्हाला मुक्त कराल.

आपला विश्वासु,

जयेश शिंगे,

लालनगर,

इचलकरंजी.

दिनांक: १४ जून,२०२१

Similar questions