India Languages, asked by omkar239891, 3 months ago

(अ-1) समास : पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून
समासाचे नाव लिहा.
i) पालापाचोळा ii) दशावतार‌​

Answers

Answered by shaikhfarhan4728
16

Answer:

*समास*

  • पालापाचोळा - द्वंद्व समास
  • दशावतार - अव्ययभावी समास
Answered by rajraaz85
3

Answer:

पाला पाचोळा -  

पाला आणि पाचोळा -द्वंद्व समास

वरील दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास.

दशावतार-

ज्याचे दहा अवतार आहेत असा

- द्विगु समास

वरील शब्दांमध्ये संख्यावाचक शब्द असल्यामुळे समुदायाचा उल्लेख होतो म्हणून द्विगु समास आहे. द्विगु समास हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे.

Explanation:

समास-

प्रत्येक भाषेमध्ये एकापासून दुसऱ्या शब्दांची निर्मिती होत असते. त्याचप्रमाणे मराठी भाषेतही जेव्हा दोन वेगवेगळ्या शब्दांपासून तिसऱ्या एका जोडाक्षराची निर्मिती केली जाते त्या वेळेस जी नियमावली पाळावी लागते त्याला समास असे म्हणतात.

मराठी भाषेत समाजाचे चार प्रमुख प्रकार पडतात.

१. अव्ययीभाव समास- या प्रकारात दोन शब्दांपैकी पहिल्या शब्दाला जास्त महत्व दिले जाते.

२. तत्पुरुष समाज- यात दोन शब्दांपैकी दुसऱ्या शब्दाला जास्त महत्त्व दिले जाते.

३. द्वंद्व समास -यात वापरल्या जाणार्‍या दोन्ही शब्दांना समान महत्त्व दिले जाते.

४. बहुव्रीही समास- यात दोन्ही शब्दांना फारसे महत्त्व दिले जात नाही.

Similar questions