अ-3) वाक्प्रचार:
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून
वाक्यात उपयोग करा :
(4)
1) मनात घर करणे
2) सार्थक होणे
3) मुहूर्तमेढ रोवणे
4) खस्ता खाणे
Answers
1) मनात घर करणे :-
अर्थ :- मनात कायम राहणे, कायमस्वरूपी लक्ष्यात असणे.
वाक्य :- शालेय जीवनातील रम्य आठवणीने प्रत्येकाच्या मनात घर केलेले असते.
________________________
2) सार्थक होणे :-
अर्थ :- सफल होणे
वाक्य :- आज सानिकाने नुत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिचे स्वप्न सार्थक केले.
________________________
3) मुहूर्तमेढ रोवणे :-
अर्थ :- कामाची सुरुवात करणे, एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे
वाक्य :- सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनेक प्रकारचे विरोध पत्करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
________________________
4) खस्ता खाणे :-
अर्थ :- खूप परिश्रम आणि कष्ट करणे, हाल अपेष्टा सोसणे
वाक्य :- आज कालच्या भ्रष्टाचारी युगामध्ये सामान्य जनतेस प्राथमिक गरजांसाठी सुद्धा खस्ता खाव्या लागतात.
३) वाक्प्रचार. (कोणतेही दोन)
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१) मुहूर्तमेढ रोवणे.
२) पेव फुटणे
३) निकाल लावणे -
४) गहिवरून येणे.