(अ-4)काव्यसौंदर्य: 'कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
Answers
Answer:
कष्टाविण फळ ना मिळते, तुझं कळते परि ना वळते.
कुठलीही गोष्ट ही सहज मिळत नाही त्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागते. हे प्रत्येक माणसाला समजते पण तरीही लोक त्याला अंगीकारत नाही.
Explanation:
वरील ओळीतून असे स्पष्ट होते की प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी व्यक्तीला अफाट परिश्रम घ्यावेच लागतात. कष्टाविना कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि जरी मिळाली तरी ती टिकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय असतात आणि ते ध्येय मिळवायचे असतील तर अफाट मेहनत घेणे हे गरजेचे असते.
आई-वडील किंवा शिक्षक हे विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतात किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतात. ते म्हणतात जर आयुष्यात आपले ध्येय गाठायचे असतील तर अभ्यास हा केलाच पाहिजे. अथक परिश्रमातूनच ध्येय प्राप्ती ही होत असते. जरी ही गोष्ट खरी असली व ती सर्वांना समजत असली,तरी भरपूर असे लोक असतात जे मेहनत घ्यायला तयार नसतात. व सहजासहजी काही मिळेल का याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. म्हणजे त्यांना ती गोष्ट समजते पण ते वळत नाही. किंवा ते ती गोष्ट स्वीकारायला तयार नसतात.