India Languages, asked by bhurewardeepti2008, 5 months ago

अंबोली घाट मला आलेला अनुभव

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे ठिकाण निसर्ग पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणून आंबोलीला पर्यटकांची नेहमी गर्दी असते. आंबोलीत गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे ,कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. आंबोलीतला धबधबा हा पर्यटकांना भुरळ घालतो. म्हणूनच पर्यटक धबधब्याखाली तासंतास ओलेचिंब होऊन नाचत परमसुख अनुभवतात. या धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांची जणू झुंबडच उडालेली असते. याशिवाय धबधब्या शेजारी ,रस्त्यावर किंवा मिळेल त्या जागेवर पर्यटकांनी आपल्या सोबत आणलेल्या म्युजिक सिस्टीमच्या तालावर बेधुंद होऊन नाचताना सर्वत्र दिसतात. कर्नाटक व गोवा येथिल पर्यटकांची बहुदा संख्या जास्त असते. जसे लोणावळा व खंडाळा हे पुणे आणि मुंबई येथील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे तसेच बेळगाव व गोव्याच्या पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.

Explanation:

hope it is helpful for you...

Similar questions