India Languages, asked by Wazerabanu, 1 year ago

A dialogue between Sun and lamp in marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
92

पणती आणि सुर्यामधील संवाद

पणती-हे सूर्य! तू किती विशाल आहेस! मी तुझापुढे किती छोटी आहे.

सूर्य- पण तू सुद्धा प्रकाश देतेस आणि मी सुद्धा

पणती- पण तुझी तर माणूस पूजा करतो.

सूर्य- पण देवाचा पूजेत तुझा शिवाय अर्थ नाही.

पणती- मला बरं वाटलं की तू हे बोललास.

सूर्य- मी फक्त तुला जाणीव करून दिली. खरा तर मी गेल्यावर तूच तर प्रकाश आणि ऊब देतेस.

पणती- खरं आहे, पण मी तर माझं काम करते.

सूर्य- पण तू स्वतः जाळून दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश देतेस. खरा तर तू माझापेक्षा मोठी आहेस.

पणती- असं काही नाही. हा तुझा मोठेपणा आहे.

सूर्य- माझी जायची वेळ झाली. येतो मी.

पणती- लवकरच भेटू

Similar questions