India Languages, asked by tanmaybhere100, 1 year ago

अंकिला मी दास तुझा
Who is the poet?


tanmaybhere100: Ans. : संत नामदेन

Answers

Answered by ItzAshleshaMane
7

Answer:

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:

संत नामदेव

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः

परमेश्वरकृपेची याचना.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:

अग्निमाजी पडे बाळू। माता धांवे कनवाळू।।

तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।

आगीमध्ये आपले लहान बाळ सापडल्यावर त्याची आई व्याकूळ, अगतिक होऊन त्या आगीमध्ये धाव घेते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तू माझ्या प्रत्येक कार्यास मदत करण्यास धावून ये. कारण मी पूर्णपणे, सर्वस्वी तुझा दास आहे. असे संत नामदेव या ठिकाणी सांगतात.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः

संकटात सापडलेल्या बाळाला वाचविण्यासाठी जशी त्याची आई धावत येते, तसा देवसुध्दा आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो, त्याच्या पाठिशी उभा राहतो. त्यामुळेच आपण तन, मन, धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश संत नामदेव यांच्या ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगातून मिळतो.

(५) प्रस्तुत कविता तुम्हांला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण:

संत नामदेवांचा ‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण असे की, आपली श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेवांनी आई-बाळ, पिल्लू-पक्षिणी, धेनू-वासरू, पाडस-हरिणी तसेच मेघ-चातक पक्षी या उदाहरणांतून अतिशय समर्पकपणे मांडलेला आहे. शिवाय आई-मुलाच्या नात्यातील प्रेमभाव व्यक्त करताना ‘देवा, तू माझी आईच आहेस. तेव्हा आपल्या या लेकराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये,’ अशी त्यांनी केलेली याचना मनाला भावते.

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:

(i) दास – सेवक

(ii) धरणी – धरती, भूमी

(iii) मेघ – ढग

(iv) धेनु – गाय

Explanation:

Hope it will help you..

Similar questions