(अ) 'काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते' या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Answers
Answer:
या काळ्या आईला म्हणजे या जमिनीला हिरव्या पिकाने सजवून टाकते असे या ओळीचे भाव सौंदर्य आहे
Answer:
दिलेल्या काव्यपंक्ती या कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत या कवितेतील आहेत.
शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून ऊभी असलेली शेतकरी महिला व तिचे दैनंदिन जीवन या कवितेच्या माध्यमातून कवयित्री प्रस्तुत केलेली आहे. शेतकरी महिलेला शेतीत काबाडकष्ट करून शेतीला हिरवेगार करायचे आहे.
शेतीत काम करत असताना अतिशय प्रेमाने ती पिक वाढवत असते. ज्याप्रमाणे आपले शरीर आपण बनवतो त्याप्रमाणे या शेतीत हिरवेगार पीक उगवून शेतीला जणू गोंधवायचे आहे असे कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगतात.
अतिशय मेहनत करून ती आपल्या शेतजमिनीला सुंदर नक्षी सारखी हिरवीगार करते. अशाप्रकारे त्या स्त्रीचे शेती बद्दल असणारे प्रेम आणि काम करण्याची वृत्ती कवितेच्या माध्यमातून दिसते.