Math, asked by thakurabhay885, 2 months ago

अंकगणिती क्रमामध्ये 5 पदे आहेत त्या पदाची बेरीज 55 व चौथे पद हे पहिल्या दोन पदाच्या बेरजेपेक्षा पाचने अधिक आहे तर अंकगणिती क्रमाची पदे काढा​

Answers

Answered by varadad25
4

Answer:

अंकगणिती क्रमाची पहिली पाच पदे 3, 7, 11, 15 आणि 19 ही आहेत.

Step-by-step-explanation:

अंकगणिती क्रमाचे पहिले पद "a" आणि समान फरक "d" मानूयात.

पहिल्या अटीनुसार,

अंकगणिती क्रमाच्या पहिल्या 5 पदांची बेरीज 55 आहे.

∴ t₁ + t₂ + t₃ + t₄ + t₅ = 55

⇒ a + ( a + d ) + ( a + 2d ) + ( a + 3d ) + ( a + 4d ) = 55

⇒ a + a + d + a + 2d + a + 3d + a + 4d = 55

⇒ a + a + a + a + a + d + 2d + 3d + 4d = 55

⇒ 5a + 3d + 3d + 4d = 55

⇒ 5a + 6d + 4d = 55

⇒ 5a + 10d = 55

a + 2d = 11 - - - समीकरण ( 1 )

दुसर्‍या अटीनुसार,

अंकगणिती क्रमाचे चौथे पद पहिल्या दोन पदांच्या बेरजेपेक्षा पाचने अधिक आहे.

∴ t₄ = t₁ + t₂ + 5

⇒ a + 3d = a + a + d + 5

⇒ a + 2d + d = 2a + d + 5

⇒ 11 + d = 2a + d + 5 - - - [ समीकरण ( 1 ) वरून )

⇒ 11 = 2a + 5

⇒ 2a = 11 - 5

⇒ 2a = 6

⇒ a = 6 ÷ 2

a = 3

आता,

ही उकल समीकरण ( 1 ) मध्ये ठेवली असता,

a + 2d = 11 - - - समीकरण ( 1 )

⇒ 3 + 2d = 11

⇒ 2d = 11 - 3

⇒ 2d = 8

⇒ d = 8 ÷ 2

d = 4

आता,

पहिले पद = a = 3

दुसरे पद = a + d = 3 + 4 = 7

तिसरे पद = a + 2d = 3 + 2 * 4 = 3 + 8 = 11

चौथे पद = a + 3d = 3 + 3 * 4 = 3 + 12 = 15

पाचवे पद = a + 4d = 3 + 4 * 4 = 3 + 16 = 19

∴ अंकगणिती क्रमाची पहिली पाच पदे 3, 7, 11, 15 आणि 19 ही आहेत.

Similar questions