अ) खालील अपूर्णकथा पुर्ण करून लिहा . समाजाचा . माझ्या शाळेची सहल निघाली होती . धुवांधार पाऊस पडत होता . घाटातील निसर्ग सौदर्य पाहण्यात आम्ही सारे दंग होतो. तेवढयात मोठ्ठा आवाज झाला.
Answers
Answer:
आजीने आवाजाच्या दिशेने पाहिले, तर एक गोरापान, तेजस्वी तरुण तिच्याजवळ आला. त्याने तिला वाकून नमस्कार केला. ’जिजी, ओळखलंस मला?“ आजीने त्याला क्षणभर न्याहाळले आणि म्हणाली, ’तुला रे कोण विसरणार विजू!“ तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित सुखद भाव तरळत होते. दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली होती.
हा विजू म्हणजे खूप वर्षांपूर्वी आजीच्या घराशेजारीच राहणाऱ्या वसुधाकाकूंचा मुलगा. त्याच्या लहानपणीच वसुधाकाकूंचे निधन झाले. त्याचे वडील कामानिमित्त बाहेर असायचे. संपूर्ण दिवस हा लहानगा विजू आजीच्या घरीच असायचा. आजीने अगदी त्याचा मुलासारखा सांभाळ केला. रोज सकाळी त्याचे वडील कामावर गेले, की हा आजीजवळ यायचा. मग याचा अभ्यास, नाश्ता करून घेणे, तो वेळेवर शाळेत जाण्यासाठी डबा, पाणी भरून देणे ही कामे आजी अगदी तत्परतेने करत असे. संध्याकाळी शाळेतून घरी परतताना विजू गल्लीच्या बोळापासून ओरडत यायचा, ’जिजी, मी आलो गं!“