अ) लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली', हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
please give me correct answer
Answers
Answer:
रात्र झाली. वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात
लपवले. म्हणाली, "इथे गुपचूप राहा. आवाज करू नका. मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते. " पिल्लांनी मान डोलावली व ती एकमेकांच्या अंगावर रेलत गुमान राहिली. वाघीण झुडपाबाहेर आली. तिने चौफेर संरक्षक नजर फिरवली व निश्चित होऊन मार्गस्थ झाली. रात्रभर जंगलात फिरून एका सांबराची शिकार करून ती परत पिल्लांजवळ आली. आईची चाहूल लागताच सर्व पिल्ले तिच्याकडे झेपावली. तिला बिलगू लागली. 'छान शिकार केलीयं बाळांनो, आपण खायला जाऊ या ' असे म्हणत वाघीण पिल्लांना चाटू लागली. जरा वेळाने ती पाण्यात शिरली. पिल्लांचा आनंद गगनात मावेना. ती नाचू लागली, खेळू लागली. त्यांनीही घपाधप पाण्यात उड्या मारल्या. या प्रसंगातून आईची माया, प्रेमळपणा, शिस्त, सुरक्षा, काळजी या मातृगुणांची वाघिणीमध्ये झलक दिसते. वाघीण व पिल्ले यांच्यातील जिव्हाळा प्रत्ययाला येतो. अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवली.
Explanation:
don't need