India Languages, asked by sheetalgalinde5177, 10 months ago

२. (अ)
(२) पुढील कृतीनुसार कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा :
शिंदे स्पोर्ट्स
एस. व्ही. रोड, मुंबई - ७.
उत्कृष्ट क्रीडासाहित्य सवलतीच्या दरात,
मागणीनुसार त्वरित पुरवठा उपलब्ध
विद्यार्थिप्रतिनिधी या नात्याने
क्रीडासाहित्याची मागणी किंवा
करणारे पत्र लिहा.
पाठवलेले क्रीडासाहित्य योग्य
दरात व योग्य संख्येने न
मिळाल्याने तक्रार करणारे पत्र
वर्गप्रतिनिधी या नात्याने लिहा.​

Answers

Answered by hadkarn
14

Answer:

I hope this answer helps you.

Attachments:
Answered by rajraaz85
3

Answer:

दिनांक: २० डिसेंबर २०२१

प्रति,

माननीय व्यवस्थापक,

शिंदे स्पोर्ट्स,

एस.व्ही. रोड,

मुंबई-७

विषय -शाळेसाठी क्रीडा साहित्याच्या मागणीबाबत.

माननीय महोदय,

मी सरस्वती विद्यालय कांदिवली येथील विद्यार्थी आहे. मला अशी माहिती मिळाली की तुमच्या येथे क्रीडा साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध केले जाते. तसेच तुम्ही उत्कृष्ट दर्जाचे क्रीडा साहित्य त्वरित पुरवतात. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे कि आमच्या शाळेतील जिमखान्यासाठी आम्हाला क्रीडा साहित्याची गरज आहे.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला खाली दिलेल्या गोष्टी लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठविण्यात याव्यात.

क्रिकेट बॉल१०

क्रिकेट बॅट १०

क्रिकेट स्टंप सेट ४

हेल्मेट ४

प्रॅक्टिस नेट-२

फुटबॉल १०

कॅरम बोर्ड ४

चेस बोर्ड ४

हॉलीबॉल ४

वरील दिलेल्या सर्व वस्तू लवकरात लवकर पाठविण्यात याव्यात ही विनंती.

दिलेल्या वस्तुं सोबत कृपया बिल पाठवणे. वस्तूंची तपासणी केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचे पैसे पाठवण्यात येतील. आम्ही आशा करतो की तुम्ही आम्हाला किमतीमध्ये चांगली सवलत द्याल.

तुमचा विश्वासू,

सुरज पाटील

विद्यार्थी प्रतिनिधी,

सरस्वती विद्यालय, कांदिवली

[email protected]

Similar questions