५. अ. पुढील मुद्यांच्या आधारे कथा लिहा. मुद्दे :- टोपीविक्या ---------- नेहमी प्रमाणे टोप्या विकण्यासाठी गावोगावी ----------- वाटेत झाडाखाली झोपतो ------------ वानर टोप्या पळवतात -------------टोपीविक्या युक्ती करतो -----------बानर फसत नाही वानर कारण सांगतात.
Answers
Answered by
6
Answer:
एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात.
थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या.
तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात.शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो.
Similar questions